Dhule Fraud Crime : कांदा व्यापाऱ्याची 58 लाखांत फसवणूक

Dhule Fraud Crime : कांदा निर्यातीच्या व्यवसायात मोठा नफा मिळत असल्याचे आमिष दाखवून दहा जणांनी नेर (ता. धुळे) येथील एका व्यापाऱ्याला सुमारे ५८ लाख रुपयांना फसविले.
Crime
Crime esakal

Dhule Fraud Crime : कांदा निर्यातीच्या व्यवसायात मोठा नफा मिळत असल्याचे आमिष दाखवून दहा जणांनी नेर (ता. धुळे) येथील एका व्यापाऱ्याला सुमारे ५८ लाख रुपयांना फसविले. २८ एप्रिल २०२३ ते १४ मार्च २०२४ दरम्यान ही फसवणूक झाली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १४) दुबई येथील तिघांसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. (Dhule Fraud Crime 58 lakh fraud of onion traders)

याबाबत व्यापारी स्वप्नील संजय जयस्वाल (रा. नेर, ता. धुळे) यांच्या फिर्यादीनुसार कलीम सलीम शेख, सलीम फतूभाई शेख, बाबा सलीम शेख, तस्लीम सलीम शेख (तिघे रा. दुबई, ह.मु. पीडब्ल्यूडी रेस्ट हाउस, रेल्वे स्टेशन रोड, शिंदे मळा, अवनवकर गल्ली, येवला, जि. नाशिक), पिंट्या (रा. कोपरगाव, ता. राहता, जि. अहमदनगर), रऊफ अब्दुल रज्जाक शेखर (रा. येवला),

अनिल भिकन सोनवणे ऊर्फ सिंगम गोल्टी, भिकन सोनवणे, जिजाबाई भिकन सोनवणे (रा. मालाड, मुंबई, ह.मु. शिवप्रसाद कॉलनी, भरतनगरजवळ, धुळे) व अमोल बेडसे (रा. गंगापूर रोड, नाशिक) यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कट रचला. (latest marathi news)

Crime
Dhule News : हद्दवाढ गावांतील कामांना 5 कोटी मंजूर : आमदार कुणाल पाटील

जयस्वाल यांचा विश्वास संपादन करत कांदा निर्यातीच्या व्यवसायात होणाऱ्या नफ्याचे आमिष दाखवून केजीएन अनियन एक्स्पोर्ट सपीस नावाच्या फर्ममार्फत एकूण १६ कंटेनरमधील कांदा निर्यात करण्यास भाग पाडले.

त्यानंतर केवळ दोन कंटेनरमधील कांद्याचे पैसे देऊन इतर कंटेनरमधील कांद्याचे ५८ लाख १२ हजार ९५ रुपये देण्यास टाळाटाळ केली. तसेच रक्कम देण्यासाठी वेळोवेळी बनावट धनादेश व नकली पावती देऊन आर्थिक फसवणूक केली. संशयितांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर श्री. जयस्वाल यांनी पोलिसांकडे धाव केली. त्यावरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.

Crime
Crime News: दोन हजारांची लाच भोवली; पोलिस उपनिरीक्षकाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com