Superintendent of Police Shrikant Dhiware along with accused and suspect in case of prohibited Gutkha traffic.
Superintendent of Police Shrikant Dhiware along with accused and suspect in case of prohibited Gutkha traffic.esakal

Dhule Crime News : वाहनासह साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; LCB ची कारवाई

Dhule Crime : शहरातील तिरंगा चौकात वाहनासह साडेतीन लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. २१) जप्त केला.

Dhule Crime News : शहरातील तिरंगा चौकात वाहनासह साडेतीन लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. २१) जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.

महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पथकाला कारवाईचे सूचित केले. (Dhule Gutkha worth three and half lakhs seized along with vehicle)

त्यानुसार एक संशयित मारुती व्हॅन (एमएच १८, डब्ल्यू ११५२) साक्रीकडून धुळे शहरातील तिरंगा चौकाकडे येताना दिसली. वाहनाला थांबवून चालकास विचारणा केली असता त्याने मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब (वय ३४, रा. तिरंगा चौक, धुळे) असे नाव सांगितले.

वाहनाची झडती घेतली असता त्यात ३८ हजार ८९६ रुपयांचा पानमसाला, २१ हजार ६२० रुपयांच्या पानमसाल्याच्या दोन गोण्या, सहा हजारांची तंबाखू, ३१ हजार ६८० रुपयांच्या पानमसाल्याच्या आठ लहान गोण्या, एक हजार ७१६ रुपयांची तंबाखू असा माल आढळला.

Superintendent of Police Shrikant Dhiware along with accused and suspect in case of prohibited Gutkha traffic.
Crime News: बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकाविणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

पथकाने या गुटखा, तंबाखू मालासह अडीच लाखांचे वाहन असा एकूण तीन लाख ४९ हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिंदे, कैलास दामोदर, प्रकाश पाटील, संजय पाटील, सुरेश भालेराव, संतोष हिरे.

रवींद्र माळी, संदीप पाटील, संदीप सरग, चेतन बोरसे, रविकिरण राठोड, सुशील शेंडे, नीलेश पोतदार, गुणवंत पाटील, हर्शल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Superintendent of Police Shrikant Dhiware along with accused and suspect in case of prohibited Gutkha traffic.
Pimpri Chinchwad Crime : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा गुंडांवर कारवाईचा धडाका; तीन टोळ्यांवर ‘मोका’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com