Dhule News : पेन्शनच्या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांतर्फे आनंदोत्सव

Dhule : २००५ नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर आनंदोत्सव साजरा केला.
Employees happiness over the Chief Minister's decision to implement pension for government employees
Employees happiness over the Chief Minister's decision to implement pension for government employeesesakal

Dhule News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात २००५ नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर आनंदोत्सव साजरा केला.

गेल्या १७ वर्षांपासून राज्य सरकारी कर्मचारी संघटना २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना ते ज्या दिवशी निवृत्त होतील त्या दिवसापासून ५० टक्के वेतनश्रेणी व त्यात डीए समाविष्ट करून जे पेन्शन लागून होईल, ते सर्वांना लागू होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात सूचित केले आहे. (Dhule Jubilation by employees over pension decision)

त्यामुळे हा दिवस सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या या आनंदोत्सवाला एस. यू. तायडे, विजय उंबरकर, बी. एच. देसले, के. एम. विरकर, जे. व्ही. पाटील, संजय काकुळदे, मोहन कापसे, एस. डी. दाभाडे, व्ही. आर. नेतकर, व्ही. आर. वाटाणे, जी. के. सांगळे, एस. बी. बोरसे, ए. एल. खांडेलकर, धनंजय खेमराज यांच्यासह महिला कर्मचारी उपस्थित होते.

दिलेला शब्द पाळला

जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी, शिक्षकांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना आर्थिक व सामाजिक सुरक्षेच्या तत्त्वावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वीकारण्यात येईल, असे लेखी व तोंडी आश्वासन पाळून विधानसभेत घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद सरकारी. (latest marathi news)

Employees happiness over the Chief Minister's decision to implement pension for government employees
Jalgaon News : तालुक्यात 8 हजार 920 कुटुंबांना मोफत साडी

निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीनेही आनंद व्यक्त केला. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आमदार मंजुळा गावित यांचे प्रतिनिधी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून, फटाक्यांची आतषबाजी करून निर्णयाचे स्वागत केले.

समन्वय समितीचे राज्याचे निमंत्रक विश्वास काटकर यांचेही अभिनंदन केले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, जिल्हाध्यक्ष चौधरी, कोशाध्यक्ष सुधीर पोतदार, कार्याध्यक्ष सुरेश पाईकराव, उपाध्यक्ष राजेंद्र माळी, सल्लागार तायडे उपस्थित होते.

Employees happiness over the Chief Minister's decision to implement pension for government employees
Jalgaon Political News : भाजपच्या उमेदवार निश्‍चितीनंतर विरोधकांची नावे ठरणार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com