Dhule News : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी लेआउट

गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी २०२३ ला गावाच्या चारही दिशांना बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना येथील सोशल ॲन्ड कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल चौधरी व सचिव प्रा. डॉ. दीपिका चौधरी द्वयींच्या संकल्पनेने करण्यात आली आहे.
Layout set up for darshan of devotees.
Layout set up for darshan of devotees.esakal

कुसुंबा : गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी २०२३ ला गावाच्या चारही दिशांना बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना येथील सोशल ॲन्ड कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल चौधरी व सचिव प्रा. डॉ. दीपिका चौधरी द्वयींच्या संकल्पनेने करण्यात आली आहे. त्यास ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.

कुसुंबा गावात श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग (पंडितनगर), श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (निळकंठनगर), श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (भगवती कॉलनी), श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (आदर्शनगर). (Dhule Layout of places for darshan of Jyotirlinga)

श्री परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग (स्वामी समर्थनगर), श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग (शिमाशंकरनगर), श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग (अंकुर मूकबधिर विद्यालय), श्री औटा नागनाथ ज्योतिर्लिंग (गल्ली नं.७), श्री काशीनाथ ज्योतिर्लिंग (अहिल्याबाई होळकर सभागृह गल्ली नं. ५), श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (गल्ली नं. ३), श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग (राजगुरुनगर वरचा प्लॉट).

श्री घृणेश्वर ज्योतिर्लिंग (घृणेश्वरनगर)आदी बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना चारही दिशांना करण्यात आली असून, या सर्व नर्मदेश्वराच्या पिंडी आहेत. त्यांच्या दर्शनासाठी भाविकांना सुमारे साडेतीन तास लागतात.

Layout set up for darshan of devotees.
Dhule News : धुळे जिल्ह्यात 29 ठिकाणी नाकाबंदी; सातशेवर वाहनांची तपासणी

भाविकांना दर्शनासाठी अजून मार्ग सुकर व सोपा होणेसाठी व वेळेची बचत होण्यासाठी अनिल चौधरी यांच्या माध्यमातून ज्योतिर्लिंगाच्या दर्शनी भागात व बाजार पेठ, बसस्टॅड अशा ठिकाणी लेआउट (नकाशा) लावण्यात आले आहेत.

त्यामुळे भाविकांना सहज मंदिराजवळ पोचण्यास मदत होत आहे. येत्या ८ तारखेला महाशिवरात्री असून, गावात कळंबेश्वर मंदिराची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते. या वेळी ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढणार असल्याने त्यांना या लेआउट (नकाशा)मुळे दर्शन करण्यास सुकर होऊन वेळेत बचत होणार आहे.

Layout set up for darshan of devotees.
Dhule News : कंत्राटी वीज कामगारांचे धुळ्यात अर्धनग्न आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com