जगण्याच्या धडपडीपुढे कोरोनाची भीती ठेंगणी

जगण्याच्या धडपडीपुढे कोरोनाची भीती ठेंगणी
dhule lockdown
dhule lockdownsakal

साक्री (धुळे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) दैनंदिन गरजा भागविणाऱ्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी छोट्या व्यवसायावर आधारित संसाराचा गाडा हाकणाऱ्यांपुढे उदरनिर्वाहासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. अनेक छोटे व्यावसायिक मिळेल त्या वाहनाचा आधार घेत गावोगावी फिरून ग्राहकांपर्यंत पोचण्याची धडपड करीत आहेत. कोरोना आजाराच्या भीतीपेक्षा पोटाची खळगी भरणे गरजेचे असल्यामुळे जगण्याचा हा संघर्ष अव्याहतपणे सुरू आहे. (coronavirus-lockdown-rickshaw-village-sell-Grocery-product)

प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे (Coronavirus dhule lockdown) अनेक लोकांचे व्यवसाय अनिश्चित काळासाठी बंद झाले. यातही छोटे व्यावसायिक फळे, भाजी विक्रेते तसेच हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. या परिस्थितीत अनेक मजूर व हातावर पोट भरणारी कुटुंबे यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. यातूनही नाउमेद न होता अनेकांनी आपल्या जगण्याचे नवनवीन मार्ग शोधण्याची शक्कल लढविली.

dhule lockdown
‘माझी वसुंधरा’मध्ये दहा महापालिकांत धुळ्याचा समावेश

दुकानाचा माल गाडीत टाकून विक्री

बाजारपेठेत दुकान असणारे व्यावसायिक जसे की किराणामाल विक्री करणारे, चप्पल बूट विकणारी, रेडिमेड कपडे विकणारे, बाजारात भाजीपाला विकणारे अशा अनेक छोट्या व्यावसायिकांनी विक्रीच्या वस्तू वाहनात भरून गावोगावी ग्राहकांपर्यंत (village sell Grocery product) पोचत ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. या विक्री व्यवसायातून आपल्या स्वतःची आर्थिक आवक करून घेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

परिवाराचा बचावही अन्‌ पोटाच्‍या खळगीचा प्रश्‍न

कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःसह परिवाराचा बचाव करणे ही बाब जरी आज आवश्यक वाटत असली तरी पोटाची खळगी भरणे, व्यवसायासाठी घेतलेल्या पैशाची परतफेड करणे हेदेखील आवश्यक आहे. परिणामी स्वतःच्या जिवाची पर्वा करणारे हे व्यावसायिक जगण्याची धडपड अव्याहतपणे सुरू ठेवून आहेत. कोरोनाच्या या वैश्विक संकटात लहान-मोठ्या व्यावसायिकांना आणि हातावर पोट असलेल्यांना केवळ आश्वासनांची खैरात न वाटता शाश्वत मदत करीत शासनाने हातभार लावावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना आजाराची भीती आहेच, परंतु दोन पैसे कमावले, तर जगणे सोयीचे होणार आहे म्हणून अशा वाईट काळात घराबाहेर पडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत व्यवसाय सांभाळण्याची आमची धडपड सुरू आहे. शासन आणि प्रशासन यांनी आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे

- रोहिदास सावंत, राजा फुटवेअर, कुसुंबा, ता. धुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com