Dhule News: मनपाचे बजेट हजार कोटींचे अन थम मशिन्ससाठी कंजुषी? साडेसातशे कर्मचाऱ्यांसाठी केवळ 5 मशिन्स

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

Dhule News : महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली खरी पण यासाठी महापालिकेने केवळ पाच थम मशिन्स उपलब्ध करून दिली आहेत.

सातशे ते साडेसातशे कर्मचाऱ्यांची हजेरी या पाच मशिन्सवर घेताना संबंधित स्वच्छता निरीक्षकांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना कराला लागत आहे.

एकीकडे तब्बल ९४० कोटी रुपयांचे बजेट मांडणाऱ्या महापालिकेकडे पुरेसे थम मशिन घ्यायलाच पैसे नसतात का, असा प्रश्न उपस्थित होतो. (Dhule Municipality budget of thousand crores Only 5 machines for seven hundred fifty employees)

महापौर प्रतिभा चौधरी यांनीही सफाई कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीचा विषय लावून धरला, त्याबाबत तक्रारी केल्या, प्रशासनाला निर्देश दिले. मोठ्या पाठपुराव्यानंतर अखेर सफाई कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू झाली आहे.

तब्बल सातशे-साडेसातशे कर्मचाऱ्यांची दिवसातून चार वेळा हजेरी घेण्यासाठी केवळ पाच थम मशिन्स उपलब्ध करण्यात आली आहेत.

त्यामुळे दोन-दोन, तीन-तीन प्रभागातील कर्मचाऱ्यांची हजेरी एका मशिनवरच घ्यावी लागत आहे, परिणामी यात अधिक वेळ जात आहे. त्यामुळे त्या-त्या प्रभागात कामावर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना उशीरदेखील होतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Nashik News: पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर खोदकाम सुरू; सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याने नागरिकांत नाराजी

प्रत्येकाकडे मशिन हवे

कर्मचाऱ्यांच्या हजेरीची ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाला स्वतंत्र किमान एक याप्रमाणे थम मशिन देणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत १३ स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत, त्यामुळे किमान १३ थम मशिन्स उपलब्ध झाली पाहिजेत.

मात्र महापालिका प्रशासन केवळ पाच थम मशिन्सवर काम ढकलत आहे. महापालिका विविध कामांसाठी झटक्यात लाखो रुपये खर्च करते. दर स्थायी समिती सभेला कार्योत्तर मंजुरीचे विषय येतात. बायोमेट्रिक मशिन्ससाठी मात्र अशी तत्परता का दाखविली जात नाही हा संशोधनाचा विषय आहे.

ठसे घेण्यातही अडचणी

थम मशिन्सवर सफाई कर्मचाऱ्यांचे ठसे घेतले जातात. मात्र, कष्टाचे काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या बोटांचे ठसे अस्पष्ट आहेत, त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे ठसे थम मशिन लवकर घेत नाही. त्यामुळेदेखील हजेरीसाठी विलंब होतो.

ही समस्या लक्षात घेता डोळ्यांचे स्कॅनिंग (आयरीस रेटिना स्कॅन) करणारी मशिन्सदेखील उपलब्ध व्हावीत अथवा त्याबाबत इतर काही पर्याय उपलब्ध होण्याची गरज व्यक्त होते.

Dhule Municipal Corporation
Nashik News: बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका! वाहतूक पोलिसांकडून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com