जवानाला 'भगोडा' म्हणणाऱया भाजप आमदारास हाकला...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

धुळेः पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप भरतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांना भाजपा आमदार अनिल गोटे यांनी भगोडा म्हणून अपमान केला असून, भाजपा आमदार व खासदार यांच्यात चाललेल्या पत्रक युद्धात ज्याचा या पत्रक भानगडीत दुरान्वये संबंध नाही. भाजपा आमदार यांनी काढलेल्या पत्रकात भारतीय सैनिक चंदू चव्हाण यांना उद्देशून भगोडा संबोधिले त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज (शुक्रवार) सकल मराठा समाज व धुळे तालुक्यातील बोरविहीर ग्रामस्त यांच्या तर्फे भाजपा आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे महाराणा प्रताप पुतळ्याजवळ दहन करण्यात आले. त्यांचे निलंबनाची मागणी यावेळी करण्यात आली.

उरी हल्या नंतर २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय जवान चंदू चव्हाण चुकून पाकिस्तानी हद्दीत गेल्या मुळे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात अडकले. चंदू चव्हाण यांची सुटका होण्यासाठी सरकारसह देशातील अनेकांनी आपापल्या परीने पाठपुरावा केला. २१ जानेवारी २०१७ रोजी ते सही सलामत भारतात परतले होते. चंदू चव्हाण यांची सुटका होण्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत होता. चंदू २०१२ मध्ये सैन्यात भारती झाले आहे. आई वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेले एक भाऊ व एक बहिण आहेत. आजी-आजोबांनी त्यांना लहानाचे मोठे केले. शालेय शिक्षण घेऊन हॉटेल कामा पासून ते हमालीकामा पर्यंतचे काम चंदू चव्हाण ने केले. पाकिस्तानच्या तावडीत गेल्या नंतर चंदू चव्हाण याचे काय हाल अपेष्टा केले. हे त्याच्याशी बोलल्या नंतर माहिती मिळते. रोज मारहाण, नशेचे इंजेक्शन काय-काय नरक यातना सांगताना चंदू चव्हाण यांना अक्षरशा रडू कोसळते. चंदू चव्हाण चे भाग्य कि खासदार व संरक्षण राज्य मंत्री हे धुळे जिल्ह्याचे असल्यामुळे त्यांची लवकर सुटका झाली. अन्यथा आज पर्यंत पाकिस्तानच्या तावडीत गेलेला जवान फार कमी असे आहेत जे भारतात परततात.

भाजपा आमदार अनिल गोटे हे स्वतः देशाची अर्थ व्यवस्थेचे लचके तोडणाऱ्या मुद्रांक घोटाळा करणारा अब्दुल करीम तेलगी सोबतचा आरोपी असून, देशद्रोही व मोक्यातील आरोपी आहे. व जामिनावर बाहेर आहे अशा व्यक्तीने भारतीय जवानाचा अपमान करण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही. आमदारचे खासदारांशी काय मत भेद आहेत ते त्यांनी त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवावे. भाजपा आमदार अनिल गोटे यांनी माफी मागावी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ अनिल गोटेंचे निलंबन करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली व उपस्थित आंदोलकांनी भाजपा आमदार अनिल गोटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पुतळ्याचे दहन करण्यात आले.  
 
यावेळी चंदू चव्हाण चे आजोबा चिंधा धोंडू पाटील, सकल मराठा समाजाचे मनोज मोरे, नाना कदम, अर्जुन पाटील, प्रदीप जाधव, संदीप सूर्यवंशी, रणजीत भोसले, संदीप चव्हाण, पंकज सोनावणे, रजनीश निंबाळकर संदीप शिंदे, संजय वाल्हे, किरण सोनावणे, समाधान करनकाळ, अरुण पवार, प्रफुल निकम, कृष्णकांत पाटील, हिरामण पाटील, दिनेश पाटील, विजय पाटील, परमेश्वर शिंदे, गोकुळ ढमढेरे, समाधान बागुल, योगेश पाटील, कुणाल पवार, ललित कोरके, सुनील भदाणे, राजू बोरसे, सनी भापकर, निलेश पाटील, अशोक पाटील, भूषण पाटील, मोनू देवरे, नाना कोळी, नितीन पाटील, महादू नागापुरे असंख्ये कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्याः

Web Title: dhule news soldier chandu chavan bjp mla anil gote politics suspension