Ladki Bahin Yojana : जिल्ह्यात 27 हजारांवर महिलांची नोंदणी! घरोघरी `माझी लाडकी बहिण` योजनेचीच चर्चा

Dhule News : राज्य शासनाकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. यात २१ ते ६५ वयोगटातील महिलेला दरमहा दीड हजार रुपये मानधन मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

Dhule News : राज्य शासनाकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. यात २१ ते ६५ वयोगटातील महिलेला दरमहा दीड हजार रुपये मानधन मिळणार आहे. ही योजना जाहीर होताच शहरी आणि ग्रामीण भागात घरोघरी सध्या केवळ लाडक्या बहिणीचीच चर्चा रंगते आहे. प्रत्येकजण आपल्या घरातून किती महिला योजनेच्या लाभार्थी ठरू शकतात, याचा कानोसा घेत आहेत. (Registration of 27 thousand women in district)

योजनेंतर्गत जिल्ह्यातून आतापर्यंत सरासरी २७ हजार १३१ महिलांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात अन्य योजनेच्या लाभार्थी नसलेल्या सर्वच महिला सध्या लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करताना दिसत आहेत. त्यामुळे सेतू, ई- सेवा केंद्रांवरही गर्दी होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार १३१ महिलांनी नोंदणी केली आहे.

नोंदणीची अशी स्थिती

नोंदणी अर्जांमध्ये १४ हजार २११ महिलांनी ऑफलाइन, तर नऊ हजार महिलांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. वैयक्तिक व शासकीय यंत्रणेबाहेरील व्यक्तींव्यतिरिक्त ही संख्या आहे. प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दुसरीकडे, योजनेंतर्गत कागदपत्रांची पूर्तता करताना महिला- पुरुष वर्गाची धावपळ होताना दिसते आहे.

अनेक जावई सासुरवाडीला फोन करून आपल्या मुलीचा प्रवेश निर्गम उतारा, शाळा सोडल्याचा दाखला तत्काळ पाठवा म्हणून साकडे घालताना दिसत आहेत. गावात सासरेबुवा, सालेबुवा मुली आणि बहिणींच्या प्रवेश निर्गमासाठी शाळा, प्रशाला व महाविद्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. (latest marathi news)

Ladki Bahin Yojana
Dhule News: ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम कागदावरच! सूचना नसल्यामुळे शाळा द्विधा मनःस्थितीत; काहींचा कृतिशील पुढाकार

शाळा लागल्या कामाला

एकाच वेळी अनेक प्रवेश उतारे, प्रमाणपत्रांची मागणी होत असल्याने मुख्याध्यापकांना रोज प्रवेश रजिस्टरमध्येही नावे शोधण्याचे काम लागले आहे. प्रत्येकजण आताच कागद हाती द्यावा म्हणून विनवण्या करताना दिसत आहेत. अशा वेळी या कागदांसाठी आलेल्या प्रत्येकाचेच मन राखताना शाळा व महाविद्यालयीन प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे.

ज्या घरात जास्त महिला आहेत, अशा घरांतून नेमक्या कोणत्या महिलांची या योजनेसाठी निवड करावयाची यासाठीही घरोघरी बैठका होत आहेत. ही योजना प्रत्यक्षात किती फलदायी ठरणार आहे, हे जाणण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आता लाडक्या बहिणींना एक जुलैपासून बँक खात्यात पैसे देण्यात येणार आहेत आणि ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत...

योजनेची व्याप्ती वाढविताना शहरांसोबत ग्रामपातळीवरही महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी जिल्हा प्रशासनामार्फत झाली आहे. पात्र महिलेचे अर्ज भरण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका-अंगणवाडी सेविका, एनयूएलएम यांचे समूह संघटक (सीआरपी), मदत कक्षप्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशासेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana
Dhule News : शिंदखेड्यात विखरण महसूल मंडळात अतिवृष्टी; खलाणे, चिलाणे येथे मातीच्या घरांची पडझड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com