Dhule Drought News : धुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळी स्थिती; उन्हाळ्याची तीव्रता वाढली

Dhule Drought : उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पारा सदतीसवर पोचलाय. दुष्काळी स्थितीत पाणीटंचाईच्या झळा गावपाड्यांबरोबर शेतीशिवारात जाणवू लागल्या आहेत.
trees along state highway are being watered by tankers. In second photograph, villagers carrying water by bullock cart.
trees along state highway are being watered by tankers. In second photograph, villagers carrying water by bullock cart.esakal

Dhule Drought News : उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पारा सदतीसवर पोचलाय. दुष्काळी स्थितीत पाणीटंचाईच्या झळा गावपाड्यांबरोबर शेतीशिवारात जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उष्णतेचा फटका वृक्षांच्या रोपट्यासह वाढ अवस्थेत असलेल्या लहान वृक्षांना बसू लागला आहे. महामार्गालगतच्या वृक्षांना जगविण्यासाठी संबंधित प्रशासनाने टॅंकरने पाणी घालण्यास सुरवात केली आहे. (Severe drought conditions in Dhule district Summer intensified)

धुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळी स्थिती आहे. बहुतांश भागात पाणीटंचाई तीव्र होत आहे. पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. लहान गावांमध्ये तीन दिवसांआड, तर मोठ्या गावांमध्ये पाच-सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. आणखी पंधरा दिवसांनंतर भीषणता वाढणार आहे.

संबंधित ग्रामपंचायतीने आतापासूनच उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुष्काळी स्थितीत शेतशिवारासह जंगलामधील पशु-पक्ष्यांही पाण्याचा फटका बसत आहे. (latest marathi news)

trees along state highway are being watered by tankers. In second photograph, villagers carrying water by bullock cart.
Dhule Fruits Rate Hike : आवक नसल्याने फळांचे दर वाढले

हे पशु-पक्षी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे फिरकू लागले आहेत. तर दुसरीकडे राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतच्या वृक्षांना पाणी देण्यासाठी टॅंकर सुरू झाले आहेत.

पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावणे आणि जगविणे किती महत्त्वाचे आहे. त्यासाठी पाणीटंचाई दूर करताना झाडेही जगविण्याचा प्रयत्न होत असल्याचे वृक्षप्रेमी तथा निवृत्त प्राचार्य विश्वासराव देसले यांनी सांगितले.

trees along state highway are being watered by tankers. In second photograph, villagers carrying water by bullock cart.
Dhule Lok Sabha Code of Conduct : पदाधिकारी दालनांच्या भिंतींनाही मोकळा श्‍वास!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com