Dhule ZP News : ‘झेडपी’च्या माध्यमातून शासकीय योजनांना गती; सिंचन विहिरी, आवास योजनेत भरीव काम

Dhule ZP : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला चालना मिळू लागली आहे.
Dhule ZP
Dhule ZP esakal

Dhule ZP News : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला चालना मिळू लागली आहे. शिक्षण आरोग्य आणि कृषी क्षेत्राचे चित्र बदलण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून, विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. (Dhule Speed ​​up government schemes through zilla parishad)

विहिरींची कामे ‘मिशन मोड’वर

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे सिंचन विहिरींची कामे मिशन मोडवर हाती घेण्यात आली. प्राप्त प्रस्तावांपैकी सात हजार ४३० प्रस्तावांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देऊन सुमारे सात हजार कार्यारंभ आदेश देण्यात आले. प्रतिसिंचन विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान आहे, त्याप्रमाणे जवळपास ३०० कोटींचा निधी यानिमित्ताने जिल्ह्यातील ग्रामीण विकासासाठी खर्ची पडणार आहे.

आवास योजनेची फलश्रुती

जिल्हा परिषदेचे सूक्ष्म नियोजन सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे विविध आवास योजनेंतर्गत उत्कृष्ट काम झाले असून, जिल्ह्यात अमृत महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वाधिक घरकुले मंजूर केल्याबाबत राज्यात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जिल्ह्याला प्राप्त झाला.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १२ हजार ९३५ उद्दिष्टापैकी पाच हजार ७८२ घरकुले पूर्ण झाली आहेत. तसेच सहा हजार ३२४ मंजूर घरकुलांपैकी चार हजार १८९ घरकुलांचे नव्याने बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मोदी आवास योजना २०२३-२४ अंतर्गत नऊ हजार ७०९ घरकुले मंजूर करण्यात आली. (latest marathi news)

Dhule ZP
Dhule News : सोने-चांदी महागल्याने बजेट विस्कळित; लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांवर संकट

यामध्ये शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. त्यातील पहिला हप्ता पंतप्रधान मोदींच्या हस्ते वन क्लिक पेमेंटद्वारे हस्तांतरित करण्यात आला आहे. शबरी आवास योजना ग्रामीणअंतर्गत दहा हजार ६५८ घरकुले मंजूर करण्यात आली.

त्यांपैकी सात हजार ७२१ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच रमाई आवास योजना ग्रामीणअंतर्गत तीन हजार ४८५ घरकुलांपैकी एक हजार ८५५ घरकुले पूर्ण झाली. तसेच ३५३ भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

७३ निवृत्तांना सेवाविषयक लाभ

जिल्हा परिषदेतील आणखी एक नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजे जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या शेवटच्या दिवशीच सेवाविषयक सर्व लाभ देण्याचा आदर्श पायंडा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी ऑगस्ट-२०२३ पासून सुरू केला असून, गेल्या सात महिन्यांत ७३ कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच सेवाविषयक सर्व लाभ मिळाले आहेत.

Dhule ZP
Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी समन्वय ठेवा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com