SAKAL IMPACT : आता विद्यार्थ्यांना सोमवारपासून शाळेत येण्याची सक्ती नाही; शासनाचे परिपत्रक

Dhule News : वाढत्या तापमानाने धुळे जिल्ह्यासह अवघा महाराष्ट्र पोळून निघत आहे. परीक्षा संपल्यानंतरही विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जात आहे.
Students
Students esakal

कापडणे : वाढत्या तापमानाने धुळे जिल्ह्यासह अवघा महाराष्ट्र पोळून निघत आहे. परीक्षा संपल्यानंतरही विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जात आहे. याबाबत ‘सकाळ’मध्ये (ता. १९ एप्रिल) ‘बेचाळीस तापमानातही शाळा सुरू ठेवण्याचा अट्टाहास का?’ या आशयाची बातमी प्रसिद्ध झाली अन शासनाने तत्काळ परिपत्रक काढले. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आली आहे. (Dhule Students are not forced to come to school due to summer heat)

शिक्षण विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे, की राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून.

सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सूचना सूचित केले आहे. (latest marathi news)

Students
Dhule News : कापडणेत आजपासून कुलदेवतांचा यात्रोत्सव!

२२ एप्रिलपासून ‘नो सक्ती’

राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना २२ एप्रिलपासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आली आहे. इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यापासून सवलत द्यावी किंवा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

सूचनांचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) घेणार आहेत. दरम्यान, शासन परिपत्रकाचे समाधान व्यक्त करीत ‘सकाळ’मधील वृत्ताबद्दल पालकांमधून आभारही व्यक्त होत आहेत.

Students
Dhule Lok Sabha Election : मतदार सुलभता केंद्राची स्थापना; कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान कक्षही सज्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com