Dhule News : रावेर सरपंच यांच्या अपात्रतेला स्थगिती; अपर आयुक्तांचा अंतरिम आदेश

Dhule : जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केल्याच्या आदेशाला अपर आयुक्त (नाशिक विभाग) यांनी अंतरिम आदेशान्वये स्थगिती दिली आहे.
Order
Order esakal

Dhule News : शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी रावेर (ता. धुळे) च्या लोकनियुक्त सरपंच दीपाली साहेबराव देवरे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केल्याच्या आदेशाला अपर आयुक्त (नाशिक विभाग) यांनी अंतरिम आदेशान्वये स्थगिती दिली आहे.

रावेर (ता.धुळे) च्या सरपंच श्रीमती. देवरे यांनी सरकारी जागेवर जास्तीचे बांधकाम करून अतिक्रमण केल्याची तक्रार माजी सरपंच अनिल भगवान शिरसाठ यांनी केली होती. (Dhule Suspension of disqualification of Raver Sarpanch Interim order of Additional Commissioner)

या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. सुनावणीअंती श्री. शिरसाठ यांच्यातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हाधिकाऱ्यांनी लोकनियुक्त सरपंच श्रीमती देवरे यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित केले होते. दरम्यान, या आदेशाच्या विरोधात श्रीमती देवरे यांनी १ मार्च २०२४ ला अपर आयुक्त (नाशिक विभाग) यांच्याकडे अपील व स्थगिती अर्ज दाखल केला.

याप्रकरणी कॅव्हेट अर्ज दाखल नाही. श्रीमती देवरे यांच्यातर्फे वकिलांनी तोंडी युक्तिवाद केला. यात सरपंच श्रीमती देवरे यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केलेले नाही. वादामधील अतिक्रमणाबाबत त्यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे अपिलाचा अंतिम निकाल होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या २३ फेब्रुवारी २०२४ च्या आदेशास स्थगिती द्यावी असा युक्तिवाद केला. (latest marathi news)

Order
Dhule News : दुग्धविकास प्रकल्पासाठी अर्ज सादर करा : प्रमोद पाटील

याप्रकरणी प्रकरणी सुनावणी कामकाज पूर्ण करून कनिष्ठ न्यायालयाची मूळ संचिका व उभय पक्षकारांचे सविस्तर युक्‍तीवादाचे आधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल. तथापि, अपीलार्थी (सरपंच श्रीमती देवरे) यांनी अपील अर्जासोबत दाखल केलेली कागदपत्र पाहता व आव्हानित आदेशाचे अवलोकन करता अर्जदार यांनी वैयक्तिकरीत्या शासकीय किंवा सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे दिसून येत नाही.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज २३ फेब्रुवारी २०२४ च्या आदेशाच्या अंमलबजावणीस २२ मार्च २०२४ पर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचा अंतरिम आदेश अपर आयुक्त नीलेश सागर यांनी दिला. दरम्यान, याप्रकरणी २२ मार्च २०२४ ला सकाळी अकराला त्यांच्याकडे स्थगिती अर्जावर सुनावणी होणार आहे.

Order
Dhule News : राऊळनगरचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रावल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com