Dhule Fire Accident : शिंदखेडा येथे दुकानांना भीषण आग! लाखोंचे नुकसान; आग शॉर्टसर्किटने आगीची शक्यता

Dhule News : यात बारा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
Shop fire
Shop fireesakal

शिंदखेडा : शहरातील जनता हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या दुकानांना मंगळवारी (ता. ३०) दुपारी दोनला आग लागल्याने त्या साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. यात बारा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. शिंदखेडा येथील अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली व पुढील अनर्थ टळला. आग शॉर्टसर्किटने लागल्याचे बोलले जाते; परंतु आगीचे निश्चित कारण कळू शकले नाही. (Dhule terrible fire broke out at shops in Shindkheda news)

शहरातील जनता हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या नाल्यावर राकेश मधुकर चौधरी यांच्या मालकीचे दोन गाळे आहेत. त्यांपैकी एक गाळा निंबा दिगंबर चौधरी यांना भाडेतत्त्वावर दिला आहे. यात निंबा चौधरी जय संताजी स्वीट ॲन्ड जनरल नावाने साहित्य विक्रीचा व्यवसाय करीत होते.

किराणामाल, सौंदर्यप्रसाधने, लग्नसमारंभासाठी लागणारे साहित्य, गोळ्या, बिस्किट, पत्रावळी, इतर कागदाचे जेवणासाठी लागणारे साहित्य, आगपेटी बॉक्स यांसह विविध विक्रीचे साहित्य दुकानात होते. दुसऱ्या गाळ्यात स्वतः मालक राकेश मधुकर चौधरी पुढच्या भागामध्ये चिकन टिक्का व्यवसायाचे दुकान व मागच्या भागात प्रिंटिंग प्रेस चालवत होते. फर्निचर, टेबल, लाइट फिटिंग, पंखे, दुकानाचे शटरप्रिंटर, रबर स्टॅम्प मशिन, ऑफसेट मशिन इत्यादी साहित्य होते. (Latest Marathi News)

Shop fire
Nashik Fire Accident : मालेगावात आगींचा सिलसिला! दरेगाव शिवारात प्लास्टिक गोदामाला सलग तिसऱ्या दिवशी आग

मंगळवारी दुपारी दोनला या दुकानांना आग लागून या दोन्ही दुकानांतील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. निंबा दिगंबर चौधरी यांच्या दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे सहा लाखांचे, तर राकेश चौधरी यांच्या दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने सहा ते सात लाखांचे नुकसान झाले. दुपारी दोनला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ शिंदखेडा नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाशी संपर्क केला.

अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली. निंबा दिगंबर चौधरी यांच्या दुकानात आगपेटीचे बॉक्स असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले व काही क्षणांतच या दोन्ही दुकानांतील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची घटना कळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. शिंदखेडा मंडळ अधिकारी आर. एच. कोळी, शिंदखेडा तलाठी एम. व्ही. गोसावी, भडणे तलाठी बी. एस. कोळी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.

Shop fire
Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com