Dhule Water Scarcity : शिंदखेडा तालुक्यातील 75 टक्के गावांमध्ये पाणीबाणी; 3 गावांना टँकरने पुरवठा

Dhule News : यंदा राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश असल्याने यंदा तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी 'वणवण' फिरावे लागणार आहे.
Rahimpure As water is being applied here by tankers, after the arrival of tankers, women and men rush for water.
Rahimpure As water is being applied here by tankers, after the arrival of tankers, women and men rush for water.esakal

विजयसिंह गिरासे : सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : यंदा राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश असल्याने यंदा तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी 'वणवण' फिरावे लागणार आहे. तालुक्यात जानेवारी महिन्यात तीन गावांना टँकरने पाणी करण्यात येत आहे. तसेच आतापासून ५० गावांना ५९ विहीरी/ कुपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. (Dhule Water Scarcity in 75 percent villages of Shindkheda taluka)

गेल्या वर्षी ४० गावांना विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. चिमठाणेसह ८५ गाव ग्रीड योजनेचे काम सुरू असल्याने ही योजना तालुक्याची तहान भागविणारी ठरणार आहे. शिंदखेडा तालुक्यात मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाचा पारा ४० अंशांपर्यत पोहोचलेला आहे. शिंदखेडा तालुक्यात १४३ महसूल गावे आहेत. शिरपूर महसूल उपविभागीय अधिकारी, शिंदखेडा तहसील.

दोंडाईचा अपर तहसीलदार व शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालया मार्फत पिण्याच्या पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यात जानेवारी महिन्या पांसून डाबली, रहिमपुरे व धावडे गावांना टॅकरने पिण्याच्या पाणीचा पुरवठा करण्यात येत आहे. एप्रिल व मे महिन्यात टॅकरची संख्या वाढणार आहे. वाडी- शेवाडी मध्य प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी अवर्तन सोडण्यात आल्याने बुराई नदी काठावरील २५ गावांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे.

अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहीरी

तालुक्यात आता पर्यंत विहीरी अधिग्रहण करण्यात आले गावे चुडाणे, जोगशेलू, कलमाडी, रूदाणे, खलाणे, सवाई - मुकटी, मेथी, कलवाडे, सुराय, टेंमलाय, सोनशेलू, कर्ले, चौगाव बुद्रुक, धावडे, डाबली, खर्दे , अक्कलकोस, महाळपूर, परसामळ , मांडळ, सार्वे,विटाई, झिरवे , दत्ताणे, मालपूर, चौगाव खुर्द, दरखेंडा, आरावे.

अलाणे, वायपूर , कुमरेज, वायपूर, साळवे, चिमठाणे, पिंप्री, दलवाडे (प्र.सोनगीर),कंचनपूर, रहिमपुरे, कामपूर, विखरण, हातनूर, वरूळ- घुसरे, कदाणे, वाघाडी बुद्रुक, वाघोदे, दसवेल, अंजनविहीरे व वाडी या गावातील विहीरी व कुंपनलिका अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.(latest marathi news)

Rahimpure As water is being applied here by tankers, after the arrival of tankers, women and men rush for water.
Dhule Lok Sabha Constituency : धुळ्यासाठी मतदार संघातीलच उमेदवार द्यावा : डॉ. शेवाळे

चिमठाणेसह ८५ गाव ग्रीड योजना प्रगतीपथावर

चिमठाणेसह ८५ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची (ग्रीड योजना ) ३०४ कोटी १० लाख १३७ रूपये किंमतीची असून यात केंद्र शासनाचा १५२ कोटी पाच लाख ६८ रूपये तर राज्य शासनाचा १५२ कोटी पाच लाख ६८ रूपये वाटा आहे. योजनेचे तांत्रिक मान्यता २८ डिसेंबर २०२२ ला देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत योजना पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. या योजनेमुळे ८५ गावांची तान भागणार आहे.

उपअभियंत्यासह शाखा व कनिष्ठ अभियंताची पाच पदे रिक्त !

शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे उपविभागीय कार्यालयाच्या उपअभियंता, तीन शाखा अभियंता व तीन कनिष्ठ अभियंता यांचे पदे मंजूर असून आता उपअभियंता, दोन शाखा अभियंता व तीन कनिष्ठ अभियंता यांचे पदे रिक्त आहेत. आता फक्त शाखा अभियंता बी व्ही फुलपगारे यांच्या वर तालुक्यांची मजल राहणार आहे.

मध्यम प्रकल्पातून १०९ दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित

प्रकल्पाचे नाव- आरक्षण गावाची संख्या - पाणी दलघफु

वाडी - शेवाडी २५ ५२.८१

अक्कलपाडा ०५ १८.४०

अमरावती ११ ३७.४७

-----------------------------------------------------------------

एकूण ४१ १०८.६८

Rahimpure As water is being applied here by tankers, after the arrival of tankers, women and men rush for water.
Dhule Water Scarcity : पाण्याअभावी फळबाग फुलली नाही; खानदेशात समृद्धी दर्शविणाऱ्या निकुंभेतील उलाढाल शून्यावर

ऑक्टोबर २०२३ ते जुन २०२४ कृती आराखडा

उपाय योजना योजना गावे खर्च

लक्ष विहीर/ कुपनलिका घेणे ०२ ०२ ३.००

नळ योजना दुरूस्ती ११ ११ १५१.००

तात्पुरती पुरक १० १० १३२.००

विहीर अधिग्रहण ९२ ९० १३६.६२

विहीर खोल/गाळ काढणे ११ ११ ४०.००

टॅकरने पाणी पुरवठा ४० ४० २९५.००

---------------------------------------------------------------------

एकूण १६६ १६४ ७५७.६२

तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना

गावाचे नाव अंदाजपत्रकीय रक्कम

विटाई ७,४४,७१०/-

दत्ताणे १,१९,७६५/-

महाळपूर २,९३,०२५/-

कर्ले ७,००,०००/-

वाडी ४,७२,४७५/-

वरूळ/घुसरे ५,७३,३४३/-

दिवी १८,३,७९७/-

Rahimpure As water is being applied here by tankers, after the arrival of tankers, women and men rush for water.
Dhule Lok Sabha Constituency : हिंदूत्व अन्‌ धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर जोर; भाजपसह काँग्रेसची प्रचार रणनीती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com