Dhule News : चक्क शिक्षकच आढळला मद्यधुंद..!

Dhule : धोंगडेदिगर पैकी पवारपाडा (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेत चक्क शिक्षकच मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.
An empty classroom at a Zilla Parishad school after the teacher sent the students home.
An empty classroom at a Zilla Parishad school after the teacher sent the students home.esakal

Dhule News : धोंगडेदिगर पैकी पवारपाडा (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेत चक्क शिक्षकच मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. हा शिक्षक शाळेत मद्यप्राशन करून आलाच; परंतु त्याने विद्यार्थ्यांनाही शाळेतून घरी पाठवून दिले. असे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून आले. (Dhule Zilla Parishad school teacher was found drunk)

या प्रकारामुळे ग्रामस्थांसह परिसरातून संताप व्यक्त केला जात असून, शिक्षण विभागामार्फत नियमित पथक नेमून अशा कामात कुचराई व दांडीबहाद्दरांवर कारवाई करण्याची मागणी होताना दिसून येत आहे. अशीच परिस्थिती साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह पिंपळनेर परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील दांडीबहादर शिक्षकांबद्दल (सकाळ ः जुलै २०२३) वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती.

याची दखल घेत एकाच दिवसात ४० ते ४५ शाळांना पर्यवेक्षक, अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केल्यानंतर दांडीबहाद्दर शिक्षकांवर कारवाई होणार आहे. अशी माहिती शिक्षण विभागाने ‘सकाळ’ला दिली होती. यानंतर शाळेत शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती होती.

पथकाने दुर्लक्ष करताच पुन्हा पिंपळनेर शहर, परिसरातील व साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा कारभार ‘हम नहीं सुधरेंगे’ म्हणत शिक्षकांच्या सोयीने सुरू असल्याचे दिसून आले आहे. अशा दांडीबहाद्दर शिक्षकांवर कारवाई होऊन जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारेल का, अशी प्रतिक्रिया जनसामान्यांमधून होताना दिसून येत आहे.

दरम्यान, अशा शिक्षकांच्या पाठीमागे आशीर्वाद कोणाचा असतो, हे शिक्षक कामात कसूर करतात व आळीपाळीने ड्यूटीवर येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याविषयी ग्रामस्थांच्या अनेक महिन्यांपासून तक्रारी येत होत्या. (latest marathi news)

An empty classroom at a Zilla Parishad school after the teacher sent the students home.
Dhule News : 31 हजार प्रकरणे निकाली, 32 कोटी भरपाई वसूल; राष्ट्रीय महालोकअदालत

आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सांगण्यावरून २८ फेब्रुवारीला धोंगडेदिगर पैकी पवारपाडा जिल्हा परिषद शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली असता भयानक परिस्थिती बघावयास मिळाली. मुख्याध्यापक व शिक्षक दोघे गैहजर होते. विद्यार्थी रामभरोसे होते. आदिवासी समाजाच्या येणाऱ्या पिढीचा भविष्याचा पाया जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्येच घडतो.

अशा ठिकाणी आदिवासी समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण आहे? कसूर करणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव संदीप भोये, आदिवासी एकता परिषदेचे पूर्व राष्ट्रीय युवा अध्यक्ष प्रेमचंद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शिंदे व पवारपाडा येथील पालक, ग्रामस्थांनी साक्री पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

"एकविसाव्या शतकात जग झपाट्याने बदलत आहे. गुरूचे स्थान देवासमान आहे. शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती, संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती, चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडविणारा शिल्पकार; परंतु जिल्हा परिषद शाळा पवारपाडा (धोंगडे दिगर) येथील शिक्षक कामात कसूर करणे, मधधुंद अवस्थेत शाळेत जात असतील तर शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना आहे. असे शिक्षक येणाऱ्या पिढीचे भविष्य बर्बाद करीत आहेत. अशा व साक्री तालुक्यातील दांडीबहाद्दर शिक्षकांवर नियमित पथक नेमून कारवाई करण्यात यावी."-प्रेमचंद सोनवणे, पूर्व राष्ट्रीय युवा अध्यक्ष, आदिवासी एकता परिषद

An empty classroom at a Zilla Parishad school after the teacher sent the students home.
Dhule News : रस्तादुरुस्तीसाठी एखादा मंत्री बोलवायचा का? धुळे शहरातील चित्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com