विजेपासून बचावासाठी ‘दामिनी ’ॲपचा वापर करावा

Damini app to protect against lightning
Damini app to protect against lightningesakal

नंदुरबार : मॉन्सून कालावधीत विशेषतः: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने तयार केलेले दामिनी ॲप वापरण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने दिल्या आहेत.

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांना ॲपचा वापर करावा.

Damini app to protect against lightning
नंदुरबार : पालिकेतर्फे प्लॅस्टीक विक्रेत्यांवर कारवाई

दामिनी ॲप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये जीपीएस लोकेशनने काम करीत असून वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. या अॅपमध्ये आपल्या सभोवतालच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्राप्त सूचनेनुसार गावातील नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.

Damini app to protect against lightning
निकृष्ट रस्ता कामाची पोलखोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com