Dhule Crime News: विनोद पवार खून प्रकरणी ज्ञानेश्‍वर राठोडला जन्मठेप

Dnyaneshwar Rathod sentenced to life imprisonment in Vinod Pawar murder case dhule news
Dnyaneshwar Rathod sentenced to life imprisonment in Vinod Pawar murder case dhule news

Dhule Crime News: सय्यदनगर (ता. साक्री) येथील विनोद पवार याच्या खून प्रकरणी जिल्हा न्यायाधीश एस. सी. पठारे यांनी आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ नाना मधुकर राठोड यास दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

तसेच दहा हजाराचा दंड ठोठावत तो न भरल्यास तीन महिने शिक्षेचा आदेश त्यांनी दिला. (Dnyaneshwar Rathod sentenced to life imprisonment in Vinod Pawar murder case dhule news)

सय्यदनगर येथील विनोद रामसिंग पवार (वय २२) हा सैन्यातील जवान सुटीवर गावी आला. त्याच्या बहिणीच्या विनयभंग प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ नाना मधुकर राठोड यास विनोद याने जाब विचारला. या कारणास्तव ज्ञानेश्वरने १२ मे २०१६ ला विनोद यास शिवीगाळ व मारहाण केली. नंतर १३ मे २०१६ ला या घटनेबाबत सरपंच व गावातील प्रमुख पंचांकडे केलेल्या तक्रारीवरून सरपंचांच्या घरासमोर सकाळी बैठक बोलविण्यात आली.

आरोपी ज्ञानेश्वर व त्याच्या इतर बारा सहकाऱ्यांनी मिळून बैठकीत शिवीगाळ करीत गोंधळ घातला. विनोद यास सर्वांनी घेरले व त्याच्यावर आरोपी ज्ञानेश्वर याने चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी विनोदला वाचविण्यासाठी मलखान गुलाब पवार धावले. त्यांच्यावरही आरोपीने वार करत जखमी केले. इतर आरोपींनी विनोद व मलखान पवार यांना मारहाण केली. गंभीर अवस्थेत विनोद व मलखान यांना साक्री येथे सरकारी दवाखान्यात नेले. तिथे डॉक्टरांनी विनोद यास तपासून मृत जाहीर केले तर मलखान यास पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आले.

Dnyaneshwar Rathod sentenced to life imprisonment in Vinod Pawar murder case dhule news
Dhule Crime News: गांजाची तस्करी ‘एलसीबी’ने रोखली; धुळ्यात ट्रकसह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

विनोदचे वडील रामसिंग गुलाब पवार यांनी साक्री पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस निरीक्षक यांनी १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. खटल्याचे कामकाज सहाय्यक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. पठारे यांच्यासमोर चालले. यात विशेष सरकारी वकील म्हणून श्‍यामकांत आर. पाटील यांची शासनाने नियुक्ती केली. सरकारी पक्षाने पंधरा साक्षीदाराची साक्ष नोंदविली.

गुन्ह्यातील मुद्देमाल दिंडोरी येथील वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. परंतु, तो गहाळ झाला. त्यानंतर न्यायाधीश पठारे व विशेष सरकारी वकील पाटील यांच्या अथक प्रयत्नातून ३० पैकी २६ मुद्देमाल न्यायालयात हजर करण्यास यश मिळाले. गुन्ह्याच्या तपासात काही त्रुटी असूनही विशेष सरकारी वकील श्री. पाटील सांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद केला. न्यायाधीश पठारे यांनी आरोपी ज्ञानेश्वर राठोड यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात विशेष सरकारी वकील पाटील यांना ॲड. अरुण देवकर यांनी सहकार्य केले.

Dnyaneshwar Rathod sentenced to life imprisonment in Vinod Pawar murder case dhule news
Dhule Crime News : देवपूरातील 3 कॅफेंवर पोलिसांचा छापा; कॅफेचालकांविरूद्ध गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com