Nandurbar News : प्रत्येक घरात वीज पोचविण्यासाठी 400 कोटी निधीचे नियोजन : डॉ. विजयकुमार गावित

वीजपुरवठा नसलेल्या घरकुलांविषयीसुद्धा पाठपुरावा सुरू असून अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांत आतापर्यंत ५५ हजार घरकुलांना वीज दिली.
Tribal Development Minister Dr. Vijayakumar gavit During the groundbreaking ceremony of Kakdiamba road in Akkalkuwa taluka
Tribal Development Minister Dr. Vijayakumar gavit During the groundbreaking ceremony of Kakdiamba road in Akkalkuwa taluka esakal

Nandurbar News : विजेअभावी ८३ गावे ७६५ पाडे अंधारात असल्याचे खासदार डॉ. हीना गावित यांनी संसदेत सांगितले होते. पंतप्रधान मोदींनी त्याची दखल घेत ‘हर घर बिजली’ योजना आणली.

त्याची अंमलबजावणी करण्यावर आपण विशेष भर दिला. वीजपुरवठा नसलेल्या घरकुलांविषयीसुद्धा पाठपुरावा सुरू असून अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांत आतापर्यंत ५५ हजार घरकुलांना वीज दिली. (Dr Vijaykumar gavit statement Planning of 400 crore fund to deliver electricity to every house nandurbar news)

दुर्गम भागातील प्रत्येक घरात वीज पोचावी म्हणून ४०० कोटी रुपये निधी उपलब्ध करण्याचे नियोजन असून, दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वैयक्तिक व सामुहिक योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

अक्कलकुवा तालुक्यातील ३० गावांमध्ये आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या रस्ते, काँक्रिटीकरण, पूल आणि तत्सम ३० विविध विकासकामांचे भूमिपूजन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित उपस्थित होत्या.

जिल्हा परिषद सदस्य आरिफ मक्रानी, प्रताप वसावे, यशवंत नाईक, पंचायत समिती सदस्य सुधीर पाडवी, अशोक राऊत, भाजप तालुकाप्रमुख नितेश वळवी, विनोद कामे, दिशा समिती सदस्य बबिता नाईक, विश्वास मराठे, जयमल पाडवी, अमरसिंग वळवी, जगदिश पाडवी, नटवर पाडवी, मनोज डागा, मथुराबाई पाडवी, सुरेश जैन, एस. बी. जैन, रमेश नाईक, महावीर पाडवी, शमशोद्दीम मक्रानी उपस्थित होते.

Tribal Development Minister Dr. Vijayakumar gavit During the groundbreaking ceremony of Kakdiamba road in Akkalkuwa taluka
Nandurbar News : अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे बोरद येथे बालकांची दिनचर्या चुकली

मंत्री डॉ. गावित म्हणाले, की जिल्ह्यात कोणी बेघर राहू नये म्हणून या वर्षी २४ हजार घरकुले वाटप करायला घेतले. स्थलांतर टाळण्यासाठी रोजगार निर्मितीवर भर दिला. अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांत पंतप्रधान सडक योजनेतून पंधरा रस्ते खासदार डॉ. हीना गावित यांनी मंजूर केले. जिल्ह्यातील प्रत्येक गाव आणि नागरिकाला पाहिजे त्या सरकारी योजनांचा लाभ करून देण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील नागरिकांना त्यांचे जीवन आत्मनिर्भर करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात. त्या माध्यमातून नागरिकांना गावातच रोजगार देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला जात असलेल्या विकासकामांची माहिती दिली तसेच जलजीवन मिशन आणि अन्य योजनांचा लाभ घेणे विषयी आवाहन केले.

Tribal Development Minister Dr. Vijayakumar gavit During the groundbreaking ceremony of Kakdiamba road in Akkalkuwa taluka
Nandurbar News : राज्याचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा : अजित पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com