Nandurbar News : खंडित विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक हैराण

MSEDCL
MSEDCLsakal

Nandurbar News : शहरात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने तीव्र तापमानात नागरिक हैराण झाले आहेत.

शिवाय अधून-मधून होणाऱ्या खंडित विद्युत पुरवठ्यामुळे छोटे व्यवसाय करणारे संकटात सापडले आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Due to low pressure electricity supply citizens were shocked in extreme temperature nandurbar news)

गेल्या पाच-सहा दिवसापासून काही वसाहतींमध्ये रात्रीच्या वेळी अतिशय कमी दाबाचा विद्युत पुरवठा मिळत असल्याने विद्युत पंखे देखील हळूवार चालतात. एसी पूर्णपणे बंद होतात. काही वेळा एकदम उच्च दाबाचा विद्युत पुरवठा होतो. एका बाजूला तालुक्यात ४३ अंशाच्या वर रोज तापमान असते.

दुपारी नागरिक घरातच राहणे पसंत करतात. मात्र बऱ्याच वेळा विद्युत पुरवठा खंडित झालेला असतो. रात्रीच्या वेळी कमी दाबाच्या विद्युत पुरवठा होतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.

विद्युत पंखे बंद राहिल्यास डासांच्या त्रास सुरू होतो अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने यामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे. म्हणून विद्युत वितरण विभागातर्फे उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MSEDCL
Nandurbar News : सौर ऊर्जेच्या साथीने फुलली शेती; अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

पावसापूर्व कामांमुळे बत्ती गुल

पावसाळ्यापूर्वीचे दुरुस्तीचे कामेही वीज वितरण कंपनीने सुरू केले आहे. लोमकळलेल्या तारा ओढणे, काही ठिकाणी वृक्षांमुळे होणारे सततचे फॉल्ट ते होऊ नये यासाठी त्या अडथळा आणणाऱ्या फांद्यांच्या छाटणीचे काम, रोहित्रांची दुरुस्ती, असे विविध कामे विद्युत विभागातर्फे सुरू आहे.

दरम्यान वाढणारे तापमान व पावसाळ्यापूर्वी होणारी वीज विभागाची कामे त्यातच कमी दाबाचा वीज पुरवठा यामुळे नागरिकांना खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. परिणामी आधीच उकाड्याने नागरिक बेजार झाले आहेत. त्यात रात्री अपरात्री तसेच, भर दुपारी ही वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा अशी अपेक्षा विद्युत वितरण कंपनीकडे नागरिकांची आहे.

"सध्या अधिक तापमान असून विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे विजेच्या अतिरिक्त भार वाढलेला आहे. काही भागात क्षमतेपेक्षा जास्त विजेची मागणी असल्याने विजेचा कमी दाब निर्माण होतो. योग्य ती माहिती घेऊन उपाययोजना केली जाईल."-सुजित पाटील, उपअभियंता विद्युत वितरण विभाग

MSEDCL
Nashik ZP News: प्लास्टिक विघटन यंत्र खरेदीची निविदा रद्द; वित्त आयोगाचा निधी वापरण्याचा निर्णय अंगलट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com