Nandurbar News : सौर ऊर्जेच्या साथीने फुलली शेती; अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Maize crop harvested using solar energy in Shiwar
Maize crop harvested using solar energy in Shiwar esakal

Nandurbar News : सततची नापिकी, पावसाची अनियमितता वीज भारनियमन, वीज बिल भरले नाही म्हणून वीज पुरवठा खंडित एक ना अनेक कारणांमुळे शेतीबद्दलची निराशा वाढत चालली आहे. (Many experimental farmers flourished their agriculture with help of solar energy based agricultural pump nandurbar news)

शेतीला केवळ पाणी व उत्कृष्ट निविष्ठा असल्यास शेतकरी आपल्या बळावर उत्पादनात मोठी वाढ करू शकतो. त्याचप्रमाणे शेतीमध्ये तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा उपयोग केल्यास उत्पादनात वृद्धी होऊ शकते. त्याचाच प्रत्यय शहादा तालुक्यात येत असून, जिल्ह्यातील पंतप्रधान कुसुम सौर योजनेंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंपाच्या साहाय्याने अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेती फुलवली आहे.

तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी बोअरवेल (कूपनलिका), विहिरीसाठी प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेत कृषी पंपासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला होता. ९० टक्के अनुदान असलेल्या योजनांच्या माध्यमातून त्यांना ७.५ अश्वशक्तीच्या पंपासाठी फक्त १० टक्के रक्कम भरावी लागली आहे.

अशा शेतकऱ्यांच्या शेतात या योजनेतील पंपाची जोडणी मिळाली असून, यावर रब्बी, खरीप हंगामात पिके घेतली जात आहेत. सध्या या पिकांना त्याच सौर पंपाच्या साहाय्याने पाणी दिले जात असून, पिके बहरलेली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maize crop harvested using solar energy in Shiwar
Nashik News : बनावट कृषी निविष्ठाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

दिवसभर सुरु असलेल्या सौर पंपामुळे पिकांना पाणी देणे सुलभ झाले असून इतर शेतकऱ्यांप्रमाणे रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी भरण्याचा त्रास वाचला आहे. तालुक्यात बहुतेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सौर पॅनल हे आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले असून वीज, वादळ, सोसाट्याचा वारा, गारा, पाऊस या नैसर्गिक आपत्तीत त्यांचे क्वचितच नुकसान होते.

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वृद्धी

वीज पडण्याचा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र बसवण्यात आले आहे. या संयंत्रात पंप सुरू केल्यावर किती ऊर्जा वापरली याची नोंद होते. संयंत्रातील बिघाड झाल्यास शेतकऱ्याला कंपनीद्वारेच कळवले जाते. शेतीमध्ये तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जेच्या उपयोग केल्यास निश्चितच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या उत्पादनात वृद्धी होऊन वेळेची आणि पैशाची बचत होत आहे.

Maize crop harvested using solar energy in Shiwar
MBBS Exam : खुशखबर! एम.बी.बी.एस. 4 ऐवजी पाचव्यांदा परीक्षा देऊन उत्तीर्णतेची संधी उपलब्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com