Nandurbar Rain Damage : जिल्हा पोलिस दल आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज

Rain Update News
Rain Update Newsesakal

Nandurbar News : जून महिन्याच्या सुरवातीस रविवारी (ता. ४) वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. चक्रीवादळाचा तडाखा जिल्ह्याला बसला असून, जिल्ह्यातील अनेक घरांचे छत, पत्रे उडाले.

अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळित झाले होते.

झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पोलिस दलातर्फे रस्त्यावरील झाडे बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. (Due to storm uprooted trees on road removed and traffic flows smoothly District Police Force ready for emergencies Nandurbar News)

जिल्ह्यातील म्हसावद पोलिस ठाणे हद्दीतील चिखली फाटा ते उमर्टीदरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार व त्यांच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर

पडलेली झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. त्याचप्रमाणे धडगाव पोलिस ठाणे हद्दीत धडगाव ते तळोदा व धडगाव ते मोलगी रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेली झाडे धडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक इशामोद्दीन पठाण व त्यांच्या पथकाने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Rain Update News
Nandur Madhmeshwar Bird Sanctury : पक्षी अभयारण्यातील नांदूरच्या राणीचे ऐन उन्हाळ्यात वीण!

त्याचप्रमाणे अक्कलकुवा पोलिस ठाणे हद्दीतून जाणाऱ्या अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामर्गावर कवली व खापर गावाजवळ रस्त्यावर १५ ते २० झाडे कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक खोळंबून पडली होती.

अक्क्लकुवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावित यांना माहिती मिळताच त्यांनी अक्क्लकुवा पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करून महामार्गावर अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका केली.

Rain Update News
NMC News : महापालिका आयुक्तपदी कोणाची नियुक्ती?

तसेच नवापूर पोलिस ठाणे हद्दीतील जुनी सावरट गावात वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे, छत उडून गेले होते.

नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी जुनी सावरट गावाचे पोलिसपाटील व नवापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने पत्रे/छत उडून गेलेल्या घरांवर गावातील नागरिकांच्या मदतीने पुन्हा पत्रे बसवून त्यांना मदतीचा हात दिला.

नवापूर शहरातदेखील वाऱ्यामुळे झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी वीज वितरण कंपनीच्या मदतीने बाजूला करून वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rain Update News
Jalgaon News : एकता महिला मंडळाची दुःखावर फुंकर! निधन झालेल्या समाजबांधवांच्या घरी पोचवणार शिदोरी

अशी आहे सज्जता

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.

पूरस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्‍भवल्यास तातडीने मदत करण्यासाठी पोलिस ठाणे व पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोहणारे, शोध व बचाव साधनांची उपलब्धता करून ठेवण्याचेदेखील निर्देश दिले आहेत. आपत्कालीन मदतीसाठी नागरिकांनी

तत्काळ डायल-११२ या टोल फ्री क्रमांकावर अगर नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क करावा. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्‍भवल्यास त्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिस दल सज्ज असून, त्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे.

तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन प्रशिक्षित कर्मचारी असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारे जेसीबी, क्रेन, लाइफ जॅकेट, दोर इत्यादी साहित्य उपलब्ध करून ठेवण्यात आलेले आहे.

Rain Update News
Revenue Department News : महसूल विभागातर्फे पंचनाम्यांना सुरवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com