मी लेकरांना घेऊन तीन दिवसांपासून मंदिरात बसलीय..मी तक्रार करणार नाही, फक्त आम्हाला घरात घ्या...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 December 2019

संबंधित महिलेने शुक्रवारी (ता.13) "सकाळ' कार्यालयात दुपारी दूरध्वनीवरून आपली कैफियत मांडली. मला माझे पती, सासू, सासरे घरात घेत नाही. कृपया मदत करा, असे तिने सांगितले. त्यानंतर घोटीच्या "सकाळ' प्रतिनिधीने वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात कळविले असता, पीडित महिला कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल करणार नसल्याचे ठाणे अंमलदारांनी सांगितले. हा वाद दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांना बोलावून मिटवला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र नातेवाईकही वादात पडण्यास तयार नसल्याचे समजते

नाशिक : सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून घराबाहेर काढलेल्या पीडित महिलेला दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. पीडित महिला उच्चशिक्षित असून, तिचे माहेर टिटोळा (जि. ठाणे) येथे आहे. तीन दिवसांपासून थंडीत उघड्यावर दोन चिमुरड्यांना घेऊन मंदिराच्या व्हरांड्यात ही महिला बसली आहे. नवरा पुण्याला असून, तो घरात घेत नाही. माझ्या कुटुंबीयांविरोधात पोलिस तक्रार दाखल करणार नाही. मात्र मला घरात घ्या, अशी आर्त हाक ती देत आहे. 

उच्चशिक्षित पीडित महिलेची आर्त हाक 

संबंधित महिलेने शुक्रवारी (ता.13) "सकाळ' कार्यालयात दुपारी दूरध्वनीवरून आपली कैफियत मांडली. मला माझे पती, सासू, सासरे घरात घेत नाही. कृपया मदत करा, असे तिने सांगितले. त्यानंतर घोटीच्या "सकाळ' प्रतिनिधीने वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात कळविले असता, पीडित महिला कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल करणार नसल्याचे ठाणे अंमलदारांनी सांगितले. हा वाद दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांना बोलावून मिटवला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र नातेवाईकही वादात पडण्यास तयार नसल्याचे समजते. शेवटी पोलिसपाटील मधुकर धांडे यांनी तिला आपल्या घरी आश्रय दिला. मात्र पुढे काय? म्हणून पीडित महिला न्यायासाठी मदत मागत आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना कळविण्यात आले असता, आम्ही सहकार्य करण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहोत, असे त्यांनी सांगितले. 
 

हेही वाचा > "कुणाला काही सांगितले, तर तुझा नवरा अन् मुलांना मारून टाकीन', असे म्हणत दिरानेच वहिनीवर.....

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Educated victim Wman Harrasment nashik marathi news