थरार...पाडत ठेवत रस्ता अडविला अन्‌ 

robbury road muktainagar
robbury road muktainagar

मुक्ताईनगर : खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यावर पाडत ठेवली. यानंतर वसुली अधिकाऱ्याचा रस्ता अडवून त्यावर चाकूहल्ला करत जखमी केले अन्‌ वसुलीचे 90 हजार रुपयांची रोकड घेऊन दोघे चोरटे पसार झाले. सदरची घटना आज रिगाव- सुळे रस्त्यावर घडली. 
जळगाव जामोद येथील क्रेडिट ऍक्‍सेस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कुटा) या खासगी फायनान्स कंपनीचा वसुली अधिकारी मिथिल बाबाराव लाठे (वय 22) सकाळी पावणे बाराच्या सुमारास मांडवा (जि. बुलढाणा) व रिगाव येथून वसुलीचे पैसे गोळा करून दुचाकीने सुळे - वढोदामार्गे जळगाव जामोद येथे जात होता. यावेळी लाल रंगाची सीडी डीलक्‍स दुचाकी (क्र. एमएच 28, एवाय 9059) दोन तरुण तोंडाला रुमाल बांधून आले. मिथिल लाठे यांच्या दुचाकीसमोर गाडी आडवी लावून रस्ता अडविला. काही कळायच्या आत दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने लाठे याच्या मानेला चाकू लावून पैशांची मागणी केली. मात्र लाठे याने त्याच्या हाताला झटका मारून निसटण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने त्याच्या पोटावर चाकूने हल्ला केला. तो जखमी झाला आणि त्याच्या हातातील बॅग हिसकावून दोघा चोरट्यांनी पोबारा केला. बॅगेत 90 हजार रुपयांची रोकड व काही महत्त्वाची कागदपत्रे होती. 

गडबडीत चोरटे घसरले पण.. 
मिथिल लाठे याच्या जवळील 90 हजाराची बॅग हिसकावून पडून जात असतानाच काही अंतरावर गेल्यानंतर चोरट्यांची दुचाकी घसरली. अपघात झाला असे वाटल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धावत जात त्यांना उचलले. त्यानंतर सदर चोरटे गाडी सुरू करून पळून जाण्यात यशस्वी ठरले. 

पूर्वनियोजित कट 
वसुली करून मिथिल लाठे हे रिगाव येथून सुळे रस्त्याने जायला निघाले; तेव्हा रिगावमध्ये सदर चोरटे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर उभे असल्याचे त्याने बघितले. मात्र त्याच्या मनात पुढील घडणाऱ्या घटनेची पुसटशी कल्पना सुद्धा आली नाही. सदर चोरट्यांनी चिंचखेडा खु. या गावात सुद्धा फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकारी विषयी चौकशी केल्याची चर्चा आहे. 

ग्रामस्थांनी घेतली धाव 
सदर घटना घडली त्यावेळी आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी ज्ञानदेव पाटील, सुरेश पाटील, सागर गोंगे, सागर इंगळे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी जखमी लाठे यांच्याकडे धाव घेतली. सुळ्याचे पोलिस पाटील उमेश बाठे यांनी पोलिसात खबर दिली. कुऱ्हा पोलिस चौकीचे सुरेश पवार व भगवान पाटील यांनी घटनास्थळ गाठून शेतकऱ्यांच्या मदतीने जखमीस कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. जखमीवर डॉ. रवींद्र सोनवणे यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे रवाना केले. त्यानंतर सहाय्यक फौजदार माधव पाटील, संदीप खंडारे, संजय लाटे, मेजर संतोष कातरे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली तसेच मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पो. नि. सुरेश शिंदे, पीएसआय निलेश साळुंखे यांनी सुद्धा घटनास्थळ गाठून शेतकऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय निलेश साळुंखे करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com