शालेय विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

jalgaon raped tray
jalgaon raped tray

जळगाव : शहरातील बारा वर्षीय शाळकरी मुलगी वर्गमित्रांसोबत घरी परतत असताना तिला आडोशाला नेऊन अज्ञात संशयिनाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच रस्त्यावरून जाणाऱ्या एकाने हटकल्याने संशयित दुचाकीवरून तेथून पसार झाला. मू. जे. महाविद्यालयाच्या मागील परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांत गुन्हा घडल्यानंतर अवघ्या आठ तासांत संशयिताला अटक केली. 
हरिविठ्ठलनगरात वास्तव्यास असलेली पीडित मुलगी सातवीत शिकते. सकाळी सात ते बारा शाळा संपल्यावर दीड वाजेपर्यंत तिची खासगी शिकवणी असते. मंगळवारी (ता.3) चुलतभाऊ आणि वर्ग मित्रांसोबत क्‍लास संपल्यावर ती घराकडे निघाली होती. यावेळी मू. जे. महाविद्यालयाच्या मागील बाजूस सायकली थांबवून पाणी पित असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबतच्या वर्गमित्रांना शिवीगाळ करून पिटाळून लावले. पीडिता एकटीच असताना तिला शेजारीच एका ब्युटीपार्लरजवळ थांबवून वेल्डिंग दुकानाजवळ आडोशाला घेत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केल्यास गळा दाबून मारण्याची धमकी दिली. दरम्यान, यावेळी एक वयोवृद्ध गृहस्थाला हा प्रकार निदर्शनास आल्याने त्याने आरडाओरड करीत शिवीगाळ केल्याने तो पळून गेला. पीडितेने घर गाठून घडला प्रकार पालकांना सांगितल्यावर आज या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलिस उपनिरीक्षक कांचन काळे तपास करीत आहेत. 


वर्गमित्रांना पिटाळून लावले 
पीडित मुलगी नेहमीच तिच्यासोबत शिक्षण घेणारा चुलतभाऊ आणि घराजवळ वास्तव्यास असलेल्या मुलांबरोबर शाळेत व शाळेतून शिकवणीला जाते. तेथूनच या मुलांसोबत सुरक्षित परत येते. मात्र, पाठलाग करणाऱ्या त्या तरुणाने या मुलीला गाठून तिच्या सोबतच्या मुलांना धमकावून पिटाळून लावले. नंतर तिला एकांतात गाठून बळजबरी केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

आठ तासांत संशयित गजाआड 
विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक कांचन काळे, गुन्हेशोध पथकातील प्रदीप चौधरी, शरद पाटील यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताच्या वाहनाचा क्रमांक मिळवला. त्यानंतर त्याचा शोध सुरू केल्यावर खोटेनगरातील अनिल लोटन ईशी (वय 46, रा. खोटेनगर) याला ताब्यात घेत चौकशी केली असता तो गुन्हा अटकेतील संशयितानेच केल्याचे आढळून आले आहे. गुन्हा दाखल होताच आठ तासांत पथकाने गुन्हा उघडकीस आणून संशयिताला अटक केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com