"तो' अपघात सप्तशृंगगडावरील नव्हे... काय व्हायरल झालं होतं नेमकं?

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 13 December 2019

दोन दिवसांपासून पूर्वी कुणीतरी अन्य व्यक्तीने सप्तशृंगगड असा नामोल्लेख करून इतरत्र घाटरस्त्यावर झालेल्या वाहन अपघाताची छायाचित्रे टाकली आहेत. ही छायाचित्रे व्हायरल झाली असून, अनेक भाविक व नागरिकांमध्ये या घटनेबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने भाविक याबाबत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कार्यालयात विचारणा करत आहे. 

नाशिक : दोन दिवसांपासून सोशल मीडियावर "सप्तशृंगगड घाटात बस अपघात' हा संदेश दुसऱ्याच ठिकाणचे जुने छायाचित्र टाकून व्हायरल केला जात आहे. मात्र, तो अपघात व छायचित्र सप्तशृंगगड घाटातील नसल्याचे सप्तशृंगी निवासिनी देवी संस्थानने कळविले आहे. 

काय झालं होतं व्हायरल...

दोन दिवसांपासून पूर्वी कुणीतरी अन्य व्यक्तीने सप्तशृंगगड असा नामोल्लेख करून इतरत्र घाटरस्त्यावर झालेल्या वाहन अपघाताची छायाचित्रे टाकली आहेत. ही छायाचित्रे व्हायरल झाली असून, अनेक भाविक व नागरिकांमध्ये या घटनेबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने भाविक याबाबत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कार्यालयात विचारणा करत आहे. 
सप्तशृंगगड येथे जाणारा घाटरस्ता सद्यःस्थितीत सुरक्षित असून, घाटरस्त्यादरम्यान कोठेही व कोणत्याही प्रकारच्या वाहन अपघाताची घटना घडलेली नाही. 

हेही वाचा > "कुणाला काही सांगितले, तर तुझा नवरा अन् मुलांना मारून टाकीन', असे म्हणत दिरानेच वहिनीवर.....

भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये...

त्यामुळे भाविक व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये व आपल्या मोबाईलवर इतरांनी पाठविलेल्या चुकीच्या माहितीचा तपशील अथवा छायाचित्राबाबत खात्री केल्याशिवाय ते इतरत्र पाठवू नये. कोणतेही तीर्थक्षेत्र अथवा ठिकाणासंदर्भात खात्री करण्यासाठी संबंधित ट्रस्ट कार्यालय, ग्रामपालिका, पोलिस ठाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, तालुका आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी समन्वय साधून त्याबाबतची अधिकृत माहिती प्राप्त करून घेण्याचे आवाहन सप्तशृंगीदेवी ट्रस्टच्या प्रशासनाने केले आहे. 

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake Viral Vani Accident at Nashik Marathi News