Nandurbar News : वनवासी विद्यालयातील मुलींसाठी मोफत बससेवा

Principal Pramod Chinchole, teachers welcoming the first bus service for girls in Vanvasi Vidyalaya.
Principal Pramod Chinchole, teachers welcoming the first bus service for girls in Vanvasi Vidyalaya. esakal

Nandurbar News : चिंचपाडा (ता. नवापूर) येथील वनवासी विद्यालय व एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलींसाठी मोफत बससेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे मुलींची शाळेत जाण्यासाठी होणारी होरपळ थांबणार आहे. (Free bus service was started for girls studying in Vanvasi Vidyalaya and SC Chavan Junior College nandurbar news)

चिंचपाडा परिसरातील सावरट, वावडी, बिलगव्हाण, बिलीपाडा, तीनमौली, बंधारे, पिंप्रीपाडा, पारकोटी, बिलबारा, कोकणीपाडा, तारपाडा, भांगरपाडा, सोनारे, केलपाडा, गंगापूर, वराडीपाडा, वडखूट, सोनखांब, बोरपाडा या गावांतील मुली वनवासी विद्यालयात शिकण्यासाठी येतात. वनवासी विद्यालयात मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग चालतात.

आठवीपासून विद्यार्थ्यांना संस्कृत विषय शिकविला जातो. शिवाय कनिष्ठ महाविद्यालयाचे आर्टस व सायन्स शाखेचे वर्ग चालतात. यामुळे वनवासी विद्यालयात बाहेरगावाहून येणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. या मुलींना आपल्या गावाहून शाळेत ये-जासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते. शाळेत ये-जा करण्यासाठी मुलींना खासगी वाहनाचा वापर करावा लागत होता. यासाठी मुलींना अधिक वेळ व पैसा खर्च करावा लागत होता.

बऱ्याच मुलींना पायी शाळेत यावे लागत होते. परिणामी अधिक शारीरिक परिश्रम होत होते. सहाजिकच अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. या बाबींचा विचार करून वनवासी विद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने मुलींसाठी बससेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मुलींना शाळेत ये-जा करताना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या अभ्यासावर होणारा परिणाम याचा विचार करून मुलींसाठी मानव विकास योजनेंतर्गत मोफत बससेवा सुरू करण्याबाबत नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना विद्यालयाच्या वतीने विनंतीपत्र दिले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Principal Pramod Chinchole, teachers welcoming the first bus service for girls in Vanvasi Vidyalaya.
Unseasonal Rain Damage : पावसाचा बेदाणा उत्पादकांना फटका; प्रत खालावल्याने भाव मिळणे मुश्कील

जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्राची तत्काळ दखल घेऊन वनवासी विद्यालयातील मुलींसाठी मानव विकास योजनेंतर्गत बससेवा सुरू केली. ही बस नवापूर-सावरट-वावडी-बिलगव्हाण-बिलीपाडा-चेडापाडा-तीनमौली-पिंप्रीपाडा-बंधारे-बिलबारा-कोकणीपाडा-तारपाडा-भांगरपाडा-सोनारे-केलपाडा-वनवासी विद्यालय-चिंचपाडा या मार्गाने ये-जा करेल.

जून महिन्यात शाळा सुरू होईल तेव्हा हायस्कूलच्या मुलींसाठी एक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींसाठी एक अशा बसच्या दोन स्वतंत्र फेऱ्या असणार आहेत. या मोफत बससेवेचा मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद चिंचोले यांनी केले. जून महिन्यात मुलांसाठीदेखील सवलतीच्या दरात बस सुरू करण्यासाठी विद्यालय प्रयत्नशील आहे, असेही प्राचार्यांनी सांगितले.

मुलींसाठी मोफत बससेवा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी यतीन सोनार, नवापूर आगारप्रमुख रवींद्र जगताप, वाहतूक नियंत्रक विनोद राठोड, वाहतूक निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक हिरालाल पाटोळे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रवींद्र ठाकरे, चालक महादेव कराड, वाहक संदीप ब्राह्मणे, चालक फजल शेख, विद्यालयाचे सर्व कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.

Principal Pramod Chinchole, teachers welcoming the first bus service for girls in Vanvasi Vidyalaya.
Nandurbar News : अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात पहचान; आश्रमशाळांत 1 हजार 94 विद्यार्थ्यांची तपासणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com