fraud case
fraud caseSakal

Dhule Fraud Crime : फळ विक्रीत 11 लाखांची फसवणूक

Dhule Fraud Crime : बेटावद (ता. शिंदखेडा) येथील एका ठोक फळ विक्रेत्याची गोधरा (गुजरात) येथील फळ व्यापाऱ्याने तब्बल ११ लाखांत फसवणूक केली. (fruit seller was cheated by fruit traders in Godhra of nearly 11 lakhs dhule fraud crime)

या प्रकरणी फळ विक्रेते रहीम खान रशीदखान पठाण (रा. बेटावद) यांनी नरडाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल झाला आहे.

विक्रेते रहीम खान पठाण यांना गेल्या वर्षी मार्च २०२२ मध्ये असलम याकूब पाडा व हफनान असलम पाडा (रा. जहूरपुरा फ्रूट मार्केट, गोधरा, गुजरात) यांनी मोबाईलने संपर्क साधत तुमच्याकडे चांगली फळे असतात म्हणून तुमच्याशी व्यवहार करावयाचा असल्याचे सांगितले.

असलमचा भाऊ अय्युब याकूब पाडा याच्याकडून मोबाईल क्रमांक मिळाल्याचे सांगितले. त्यानुसार गेल्या वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात असलम पाडा व त्याचा मुलगा हफनान पाडा बेटावदला आले आणि सरासरी दहा ते पंधरा लाखांपर्यंतचा माल घेणे व महिन्याभरात मालाचे पैसे देण्याचे ठरले.

असलम पाडाचा भाऊ अय्यूब समव्यावसायिक असल्याने ओळखीचा होता. त्यामुळे रहीम खान पठाण यांचा विश्वास बसला. बेटावद येथून टरबूज वेळोवेळी गोधरा येथे रवाना करण्यात आले. सर्व मिळून १२ लाख २५ हजार ११४ रुपयांचा टरबूज रवाना करण्यात आला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

fraud case
Dhule Fraud Crime : शेतकऱ्याची सव्वादोन लाखांत फसवणूक; व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा

माल पोचल्याची पावती मिळाली व मालाचे एकदा गोधराच्या व्यापाऱ्याने एक लाख २० हजार रुपये २४ मार्च २०२२ ला रहीम पठाण यांच्या सांगण्यावरून त्यांचे जावई अफझल मिर्झा यांच्या बँक खात्यात वर्ग केले.

उर्वरित ११ लाख पाच हजार ११४ रुपये वर्ष झाले तरी मिळाले नाहीत. वारंवार मागणी करूनही त्यांनी चालढकल करून वेळ मारून नेली. रहीम पठाण मुलगा एजाज पठाणसह ८ जुलैला गोधरा गेले असता त्यांना पैसे मिळणार नाहीत, तुमच्याने जे होईल ते करा, अशी दमदाटी करून धमकी देण्यात आली. घाबरून ते स्थानिक पोलिस ठाण्यात (बी डिव्हिजन गोधरा) तक्रारीसाठी गेले. मात्र, उपयोग झाला नाही.

फसवणूक व विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्याने रहीम पठाण यांनी आधी धुळे पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज केला व नरडाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याप्रमाणे संशयित असलम पाडा व हफनान पाडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हवालदार गोटीराम पावरा तपास करीत आहेत.

fraud case
Dhule Fraud Crime : अपंग युनिट प्रकरणी चौघे न्यायालयीन कोठडीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com