Dhule Crime News : लसणाचा पिकअप पळविणारी खंबाळे परिसरातील टोळी गजाआड

Dhule Crime : ४० क्विंटल लसूण भरलेली पिकअप पळवून नेल्याच्या संशयावरून खंबाळे (ता. शिरपूर) परिसरातील दहा जणांच्या टोळीला मध्य प्रदेशातील सेंधवा पोलिसांनी अटक केली.
Madhya Pradesh Police team with robbery suspects.
Madhya Pradesh Police team with robbery suspects.esakal

Dhule Crime News : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनावर सशस्त्र दरोडा टाकून चालकाला मारहाण करीत सुमारे ४० क्विंटल लसूण भरलेली पिकअप पळवून नेल्याच्या संशयावरून खंबाळे (ता. शिरपूर) परिसरातील दहा जणांच्या टोळीला मध्य प्रदेशातील सेंधवा पोलिसांनी अटक केली.

त्यांच्याकडून साडेबारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. चार संशयित फरारी असून, त्यांना पकडून देणाऱ्यास एकूण दहा हजार रुपयांचे पारितोषिक पोलिसांनी जाहीर केले.

इंदूर येथून लसूण घेऊन पिकअप (एमएच १५, एचएच ६०४९) २२ फेब्रुवारीला नाशिककडे जात होती. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासन घाटात गतिरोधकावर पिकअपचा वेग मंदावतच मागून आलेल्या दुसऱ्या पिकअप (एमपी ०९, बीसी ७४६८)ने तिला अडविले. तिच्यातून उतरलेल्या टोळीने गराडा घालताना पिकअपची काच फोडली.

चालकाला खाली खेचून मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून त्यांच्या पिकअपमध्ये बसविले. त्याच्याकडील १५ हजार रुपये हिसकावून घेतले. सुमारे दोन तासांनंतर पुढे नेऊन पिकअपमधील लसूण अन्य एका पिकअपमध्ये टाकून चालकाला रस्त्यावर फेकून ते फरारी झाले.

चालकाने बिजासन पोलिस चौकीत दरोड्याबाबत माहिती दिली. बडवानीचे पोलिस अधीक्षक पुनीत गेहलोत, अप्पर अधीक्षक अनिल पाटीदार व सेंधव्याचे पोलिस उपअधीक्षक कमलसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पुरी यांनी प्रत्येकी दहा पोलिसांचा समावेश असलेली पाच पथके तयार करून चौकशीकामी रवाना केली.

Madhya Pradesh Police team with robbery suspects.
Nagpur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीच्या मित्राची हत्या, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

तांत्रिक तपास व खबऱ्यांनी दिलेल्या माहितीआधारे गुन्हा घडल्यापासून अवघ्या १२ तासांतच १४ पैकी ११ संशयितांना अटक करण्यात आली. संशयितांमध्ये सुरेश जगराम पावरा (वय २५), ज्ञानेश्वर राजू पावरा (१९), गणेश फुलसिंग पावरा (३०), सागर दिलीप पावरा (२४), नजऱ्या भीमसिंह पावरा (२६).

अजय नंदू पावरा (३०), लक्ष्मण भुरा पावरा (२२), सचिन चरणसिंह पावरा (२६), दिनेश मूलचंद पावरा (३४), कृष्णा मांगीलाल पावरा (२८, सर्व रा. खंबाळे, ता. शिरपूर), राकेश रामजी यादव (३४, रा. सोलन, ता. वरला, जि. बडवाणी) यांचा समावेश आहे.

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने, रोकड व लसणाचे ७० कट्टे जप्त करण्यात आले. ज्ञानेश्वर भावसिंह पावरा, मानसिंग लकड्या पावरा, अनिल मूलचंद पावरा व अक्षय मंगलसिंह पावरा (सर्व रा. खंबाळे) फरारी आहेत. त्यांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी अडीच हजार रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले.

Madhya Pradesh Police team with robbery suspects.
Crime News: झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने ओतले ॲसिड; कारण ऐकून बसेल धक्का

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com