Gharkul Yojana Scam : मूळ लाभार्थ्याएवजी दुसऱ्यालाच घरकुलाचा लाभ; रामपूर येथील घटना
Gharkul Yojana Scam : घरकुल मंजूर केले लाभार्थ्याच्या नावावर मात्र स्वतःचा फायद्यासाठी ग्रामसेवक, सरंपच व ग्रामरोजगारसेवक यांनी संगनमत करून त्याचा लाभ लाभार्थ्यास न देता दुसऱ्यालाच देऊन मोकळे झाले असल्याची घटना रामपूर (ता. अक्कलकुवा) येथे उघडकीस आली.
याप्रकरणी अक्कलकुवा येथील गटविकास अधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंच व ग्रामरोजगार सेवकावरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. (gharkul scheme scam Benefits of Gharkul to someone else instead of original beneficiary nandurbar news)
अधिक माहिती अशी ः अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथे २०१९-२०२० मध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बेघर असलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना व इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुले बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आले. त्यात त्याच गावातील एच. जी. वळवी या लाभार्थ्यांच्या नावानेही घरकुलसाठी एक लाख वीस हजार रुपये मंजूर झाले.
ज्याचातून त्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळणार होते. त्यासाठी त्यांचा नावाने प्रस्तावही ग्रामपंचायतीमार्फत पाठविण्यात आला होता. ग्रामसभेत लाभार्थी निवड झाली होती. असे असताना घरकुलाचा निधी मंजूर झाल्यानंतर तत्कालीन ग्रामसेवक आनंदा पाडवी, सरपंच कौशल्या वळवी व ग्रामरोजगारसेवक शांताराम पाडवी या तिघांनी संगनमत करून एच. जी. वळवी यांचा नावावर मंजूर घरकुलाचा लाभ गावातीलच प्रतापसिंग वळवी यांना देऊन टाकला.
त्यासाठी प्रतापसिंग वळवी यांच्याऐवजी त्यांचा मुलगा प्रकाश याचा बॅंक खात्यात घरकुलाचे पैसे वर्ग करण्यात आले. ही बाब प्रशासनाच्या चौकशीत लक्षात आले. याची तपासणी करून तत्कालीन ग्रामसेवक आनंदा ओजना पाडवी, सरपंच कौशल्या वळवी व ग्रामरोजगारसेवक शांताराम पाडवी या तिघांविरुद्ध गटविकास अधिकारी लालू पावरा यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता
दरम्यान, रामपूर (ता. अक्कलकुवा) येथील एकच घटना नाही, तर अशा प्रकारचे धडगाव तालुक्यातही अनेक प्रकार घडल्याचा तक्रारी होत्या. त्यातही अनेक लाभार्थींना तर माहितीही नाही की आपल्या नावावर घरकुल मंजूर आहे. त्याचा लाभ कोणी घेतला आहे. त्यासोबतच प्रत्यक्षात घरकुलेही बांधले नसल्याचे चित्र होते.
प्रशासनास व बँकांकडे एकाच बांधकामाचे वेगवेगळ्या अँगलने छायाचित्र काढून तेच जोडून निधी हडप केला आहे. तेवढेच नव्हे तर धडगाव येथील झेरॉक्स चालकाने आधारमध्येही फेरफार करून अनेक उपदव्याप केल्याचा चर्चा होत्या.
त्याबाबत सहा महिन्यापूर्वी जिल्हा परीषदेतर्फे एक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.मात्र ती चौकशी समितीचे काम अद्यापही पूर्ण झालेले दिसत नाही. समितीने इमानदारीने चौकशी केल्यास अनेक गबाड निष्पन्न होतील. त्यात ग्रामपंचायतीचे सरपंच ,ग्रामसेवक, बॅंकाचे व्यवहार समोर येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.