Dhule News : रुग्णालयातून निघाल्यावर मुलगी बेपत्ता

Missing Girl News
Missing Girl Newsesakal

Dhule News : येथील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुग्णालयातून निघाल्यावर मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. पोलिस ठाण्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही माहिती दिली.

चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार पूजा संभाजी पाटील (वय २२, रा. नंदाळे बुद्रुक, ता. धुळे) ही चाळीसगाव रोडवरील हयात हॉस्पिटल येथे नर्सिंग कोर्ससाठी मुक्कामी राहत होती. (Girl went missing after leaving hospital Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Missing Girl News
Jalgaon NMU News : 54 हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रकं DigiLocker वर

तिला १९ मेस सकाळी साडेपाच ते सायंकाळी सातपर्यंत मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद येत होता. त्यामुळे तिचा हॉस्पिटलमध्ये तपास केला असता ती पहाटे पाचला दवाखान्यातून निघून गेली, असे तिच्या मैत्रिणींनी सांगितले. तिचा धुळे शहरासह बाहेरगावी नातेवाइकांकडे तपास करण्यात आला.

मात्र, तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. बेपत्ता पूजा शरीराने मजबूत, रंग- गोरा, उंची- ५ फूट ४ इंच, केसाची ठेवण मोठी, चेहरा लांबट, डोळे मोठे, नाक- सरळ, अंगात मेंहदी कलरचा टॉप, भाषा हिंदी, मराठी अहिराणी अवगत आहे. तिच्या सोबत ९२०९३ ८९७२१ हा मोबाईल क्रमांक आहे.

या वर्णनाची मुलगी कोणास आढळल्यास चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

Missing Girl News
Jalgaon Accident News : सुसाट ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com