Dhule Crime News : साक्री तालुक्यात नाकाबंदी; 30 लाखांवर गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साक्री तालुक्यात नाकाबंदी करीत दोन वाहनांतून २९ लाख ५५ हजारांचा गुटखा व पान मसालासह ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
Shrikant Dhiware, Dattatreya Shinde and team present during the inspection of gutkha stock seized by LCB.
Shrikant Dhiware, Dattatreya Shinde and team present during the inspection of gutkha stock seized by LCB.esakal

Dhule Crime News : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साक्री तालुक्यात नाकाबंदी करीत दोन वाहनांतून २९ लाख ५५ हजारांचा गुटखा व पान मसालासह ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले.(Gutkha worth 30 lakhs seized in Sakri taluka dhule crime news)

अहवा (गुजरात) येथून वार्साकडे (ता. साक्री) पिकअप (एमएच ४१ एजी २४७२) व इको (एमएच २४ एएफ ०४९३) वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली. दोन्ही वाहने शेंदवड (ता. साक्री)मार्गे येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार एलसीबी पथकाने शेंदवडजवळ नाकाबंदी केली.

एका हॉटेलजवळ पथकाला दोन्ही संशयित वाहने उभी असल्याचे दिसले. पथकाने वाहनांचे चालक पंकज कैलास भोई (रा. वृंदावननगर, पिंपळनेर, ता. साक्री) तसेच रामजतन अवधराम प्रजापती (रा. महात्मा फुले कॉलनी, पिंपळनेर) याला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी वाहनातील गुटखा हा रवींद्र साबळे (रा. पिंपळनेर) याच्या मालकीचा असल्याचे सांगितले.

Shrikant Dhiware, Dattatreya Shinde and team present during the inspection of gutkha stock seized by LCB.
Dhule Crime News : दोंडाईचा जिल्हा बँकेत 31 लाखाचा अपहार; शासकीय अनुदानाची परस्पर विल्हेवाट

दोन्ही वाहनात १३ लाख १८ हजार २८० रुपयाचा पानमसाला, १२ लाख ९४ हजार ५९२ रुपयांचा पानमसाला, तीन लाख ४३ हजारांची तंबाखू, असा एकूण २९ लाख ५५ हजार ८७२ रुपयांचा माल आढळला. दोन वाहनांसह सुमारे ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, दिलीप खोंडे, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, हर्शल चौधरी, जितेंद्र वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Shrikant Dhiware, Dattatreya Shinde and team present during the inspection of gutkha stock seized by LCB.
Dhule Crime News : सनी साळवे खून प्रकरणी चौघा जणांना दुहेरी जन्मठेप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com