जळगाव: सन १९४२ ला ‘चले जाव’चा नारा गुंजला. १८५७ नंतरचा सर्वांत मोठा क्रांतिकारी लढा सुरू झाला. देशभरात अनेक क्रांतिकारक रस्त्यावर उतरले. अनेकांना बलिदान द्यावे लागले. खानदेशही यात मागे नव्हता. अगदी, रेल्वे बंद पाडण्यापासून ते टपाल कार्यालये, रेल्वेस्थानके उडवून देण्यापर्यंत इथल्या सुपुत्रांनी स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र सहभाग घेतला. ऑगस्ट क्रांतिदिनाचा हा दीर्घकालिन संघर्ष जळगावच नव्हे, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील क्रांतिकारकांच्या रक्तरंजित बलिदानातून उभा राहिलांय.