शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शिक्षकांचा पगारासाठी ठिय्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

गेल्या दीड-दोन महिन्यांपूर्वी शाळेच्या मुख्याध्यापकांसह दहा संशयित शिक्षकांवर बेकायदेशीर रद्दी विकल्याप्रकरणी जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासूनच शाळेच्या मुख्याध्यापकपदाला संबंधित शिक्षण विभागाने मान्यता दिली नाही.

जळगाव: "जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी' या शिक्षण संस्थेतील दोन संचालक मंडळांच्या वादात न्यू इंग्लिश स्कूलच्या कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहेत. शंभर ते सव्वाशे कर्मचारी पगारापासून वंचित आहेत. त्यामुळे आर्थिक टंचाई भासून उपासमारीची वेळ आल्याने  मंगळवारी शिक्षकांनी "सीईओं'कडे कैफियत मांडली. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. 

क्‍लिक कराः पोलिस ठाण्यासमोर अंधार...आणि पोलिसदादा अडकला सापळ्यात ! 
 

जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी आंदोलन केल्यानंतर समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन, अमित देशमुख यांनी चर्चा करीत शिक्षणाधिकाऱ्यांशी फोनवर बोलून तत्काळ पगार करण्याबाबत सूचना दिल्या. गेल्या दीड-दोन महिन्यांपूर्वी शाळेच्या मुख्याध्यापकांसह दहा संशयित शिक्षकांवर बेकायदेशीर रद्दी विकल्याप्रकरणी जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासूनच शाळेच्या मुख्याध्यापकपदाला संबंधित शिक्षण विभागाने मान्यता दिली नाही. परिणामी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दोन महिन्यांची पगार बिले वित्त विभागाकडे पाठविण्यास अडचण निर्माण झाली आहे.

नक्की वाचा : जळगावातून हैद्राबाद, जयपूर, पुण्यासाठीही "उडान' शक्‍य 
 

यामुळे दोन दिवसांत निर्णय न झाल्यास 5 मार्चला ठिय्या आंदोलन व 7 मार्चपासून शालेय कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. निवेदन देतेप्रसंगी ज्योत्स्ना विसपुते, कपिल शर्मा, आर. पी. कुळकर्णी, यू. एम. माळी, सुरेश सुरवाडे, अशोक पाचपोळ, आर. एस. ठाकूर, आर. डी. येवले, आर. एस. ठोसरे, पी. एम. पाटील अर्चना ठाकरे, जे. एस. राठोड आदी उपस्थित होते. 

आर्वजून पहा : ‘त्या’ भिकाऱ्याच्या थैलीत आढळल्‍या विदेशी नोटा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news education officials, teachers are paid for salary