esakal | अस्थिरतेमुळे सोन्याची बाजारपेठ मंदावली 
sakal

बोलून बातमी शोधा

अस्थिरतेमुळे सोन्याची बाजारपेठ मंदावली 

शेअर मार्केटमधील अस्थिरता यासह परकीय चलन व रुपयातील विनिमय दरात निर्माण झालेली तफावत यामुळे सोने- चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे. येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्माण झालेली अस्थिरता दूर होईल. 
 अजय ललवाणी, माजी अध्यक्ष, जिल्हा सराफ असोसिएशन 

अस्थिरतेमुळे सोन्याची बाजारपेठ मंदावली 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या डॉलर व रुपयाच्या विनिमय दरातील तफावत, शेअर मार्केटमधील अस्थिरता या कारणांमुळे सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवड्यापूर्वी 44 हजार रुपयापर्यंत मुसंडी मारलेल्या सोन्याच्या दरात या दोन दिवसांत तब्बल हजार रुपयांनी घट झाली. या सातत्याने होणाऱ्या बदलामुळे व्यापाऱ्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे सोने-चांदीच्या मार्केटमध्ये देखील मंदीचे सावट निर्माण झाले आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थितरता निर्माण झाली आहे. यामुळे देशात आर्थिक मंदीचे सावटही निर्माण झाले असून, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह उद्योजकांना बसू लागला आहे. यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा परिणाम हा सोने चांदीच्या व्यापारावर देखील होत असतो. गेल्या दोन आठवड्यात सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ होऊन सोन्याचे दर 44 हजारांपर्यंत पोहचले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून सोन्याचा दर अचानक कमी-अधिक होत आहे. यामुळे सोने चांदीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील त्याचा फटका सहन करावा लागत असल्याची माहिती शहरातील सोने- चांदीच्या व्यापाऱ्यांनी दिली. 

नक्की वाचा : भिषण दुर्घटना; सोनगडजवळ तिहेरी अपघातात दहा ठार 

वायदा बाजारातील बदलाचे कारण 
सोने - चांदीच्या वायदा बाजारात व्यापाऱ्यांकडून सोने- चांदीची बुकिंग केली जाते. वायदा बाजारात व्यापाऱ्याने घेतलेल्या सोन्याचे अकाऊंट हे महिन्याच्या 5 तारखेपर्यंत करावे लागते. तसेच वायदा बाजारात निर्माण झालेल्या बदलामुळे त्याठिकाणी निर्माण झालेल्या मंदीमुळे सोने बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. 

आर्वजून पहा : भुसावळ हादरले; भरदिवसा युवकाचा खून
 

 
युद्धजन्य परिस्थितीचे सावट 
सोने - चांदीच्या बाजारपेठेत दिवसातून तीन वेळा सोने - चांदीच्या दरात बदल होत असतो. या दरानुसार सट्टाबाजारात देखील मोठी उलाढाल होते. तसेच गेल्या चार महिन्यांपासून अमेरिका व इराण दोन देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे चार महिन्यात सोन्याच्या दरात सुमारे 10 हजार रुपयांनी वाढ झाली होती. मात्र, आता त्याठिकाणावरील परिस्थिती नियंत्रणात आली असून, सोन्याचे दर कमी होत असल्याचे सोने व्यापाऱ्यांनी सांगितले. 


"कोरोना'चा परिणाम 
चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठे बदल झाले आहे. यामुळे सोने - चादीच्या दरात मोठी वाढ झाली असून, सोने- चांदीच्या व्यापारात देखील कोरोनाचा परिणाम झाला असल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली. 
  

क्‍लिक कराः महाजनांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीचे हा...तगडा नेता उतरला मैदानात !