esakal | महापालिकेच्या गाळेवसुलीतील पन्नास कोटींतून रस्त्यांची कामे 

बोलून बातमी शोधा

jmc imarat imege

गाळ्यातून थकबाकीपोटी 150 कोटींची वसुली अपेक्षित आहे. वसूल झालेल्या रकमेपैकी किमान 50 कोटींतून रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय महापौर भारती सोनवणे यांनी घेतला आहे. 

महापालिकेच्या गाळेवसुलीतील पन्नास कोटींतून रस्त्यांची कामे 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : शहरात सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्ती करण्याबाबत महापौरांनी पाऊल उचलले आहे. त्यासाठी मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांच्या गाळ्यातून थकबाकीपोटी 150 कोटींची वसुली अपेक्षित आहे. वसूल झालेल्या रकमेपैकी किमान 50 कोटींतून रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय महापौर भारती सोनवणे यांनी घेतला आहे. 

नक्की वाचा : जळगावातून हैद्राबाद, जयपूर, पुण्यासाठीही "उडान' शक्‍य 
 

रस्त्यांच्या कामाबाबत महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी स्थायी सभापती ऍड. शुचिता हाडा, शिवसेना नगरसेवक नितीन लढ्ढा, भाजप गटनेते भगत बालाणी, धीरज सोनवणे, नवनाथ दारकुंडे, कुलभूषण पाटील, शहर अभियंता सुनील भोळे, मुख्यलेखाधिकारी कपिल पवार उपस्थित होते. बैठकीत महापौरांनी शहरातील अत्यावश्‍यक रस्त्यांची यादी दोन दिवसात सादर करण्याची व निविदा तयार करून कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्याच्या सूचना दिल्या आहे. 

क्‍लिक कराः पोलिस ठाण्यासमोर अंधार...आणि पोलिसदादा अडकला सापळ्यात ! 
 

"अमृत'चे काम लवकर पूर्ण करा 
"अमृत'अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत महापौरांनी आढावा घेतला. यात जलवाहिनीचे टाकण्याचे काम 65 टक्के झाले असून, नळसंयोजन जोडणीचे काम 22 टक्के झाले आहे. त्यामुळे जुने काम पूर्ण केल्याशिवाय पुढे नवीन कामाला सुरवात करू नका, अशा महापौरांनी सूचना दिल्या. संथगतीने काम होत असेल तर मक्तेदाराकडून दंड करण्याचे आदेश महापौरांनी दिले. 
 

आर्वजून पहा : ‘त्या’ भिकाऱ्याच्या थैलीत आढळल्‍या विदेशी नोटा