त्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले ह्या मुख्यमंत्र्यांनी थांबविले...शंभर कोटीला रेड सिग्नल

algaon_municipal
algaon_municipal

जळगाव : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध शहरातील विकास कामांकरिता विविध योजनेंतर्गत 100 कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांना शासनाने आज स्थगिती दिली आहे. 100 कोटींपैकी 34 कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली होती. त्या कामांना आता रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे. आता मनपाला सुमारे अडीचशे कामांच्या निविदा थांबवाव्या लागणार आहेत. 

जळगाव शहरातील गटारी, नाले, संरक्षण भिंत, मोकळ्या जागांचा विकास, जॉगिंग ट्रक, ओपन जीम आदी कामांसाठी फडणवीस यांनी महापालिकेला शंभर कोटींचा निधी दिला होता. मिळालेल्या 100 कोटींच्या निधीतून पन्नास कोटींच्या कामांचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे दिला होता. त्या पैकी 34 कोटींच्या कामांच्या निविदा प्रक्रिया झाली होती. येत्या 30 डिसेंबरपर्यंत निविदेची अंतिम मुदत आहे. मात्र, शासनाने आज विकासकामांना दिलेल्या स्थगितीमुळे ही निविदा आता थांबणार आहे. 

शहरातील कामे थांबणार 
भाजपची महापालिकेवर सत्ता आल्यावर भाजपचे गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर आमदार सुरेश भोळेंच्या प्रयत्नातून शंभर कोटी शासनाकडून मंजूर झाले होते. त्यातून विविध विकास कामांचे नियोजन सर्व 19 प्रभागांत करण्याचे नियोजन केले होते. परंतु, शासनाकडून निधीतील कामांना ब्रेक दिल्याने आता शहरातील विविध विकासकामांना आता ब्रेक लागला आहे. 

असे आहेत आदेश 
शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना काढलेल्या आदेशात सन 2019-20 साठी विविध योजनांतर्गत शासनाने वितरित केलेल्या निधीपैकी ज्या कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप दिले नाहीत, अशा कामांना पुढील आदेशापर्यंत स्थगित करावे. तसेच ज्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत, अशा कामांची यादी उद्या (ता. 6) सायंकाळी पाचपर्यंत शासनाकडे पाठवावी. तशी यादी न पाठविल्यास अशा कामांचा कार्यादेश दिलेला नाही, असे समजण्यात येऊन संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांच्या आदेशात देण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com