जळगाव जिल्ह्यात अनैतीक संबधांतून महिलेचा खून केल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

  • तिसवर्षीय विवाहीतेस मारुन फेकल्याचा संशय
  • अनैतीक संबधांतून खुन केल्याचा अंदाज
  • दोघा तरुणांसह विवाहीतेच्या पतीला अटक

जळगावः शिरसोली येथील नेव्हऱ्या मारुती जवळील खडी मशिनवर कार्यरत पावरा कुटूंबातील महिलेचा मृतदेह जवळच नाल्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. मेहरुणच्या अठरा वर्षीय तरुणाच्या मृत्युच्या घटनेला पंधरा दिवस उलटत नाही तोवर आज (मंगळवार) दुसरा खुन झाल्याच्या वृत्ताने पोलिसांसह ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. औद्योगीक वसाहत पोलिसांनी घटनास्थळभ पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला. अनैतीक संबधातून खुन झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे.

घटनास्थळावरुन घेतलेली माहिती नुसार, शिरसोली रोडवरील बापू झोपे यांचे नेव्हऱ्या मारुती मंदिरा जवळ स्टोनक्रशर मशीन आहे. येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून राजू मानसींग बारेला (वय-35) हा पत्नी ममता व कुटूंबीयासोबत वास्तव्याला आहे. खडीमशीनवर दिवसभर काम व रात्री राखणदारी करुन हे दाम्पत्य गुजराण करीत होते. सोमवारी (ता. 3) नेहमी प्रमाणे काम अटोपल्यावर रात्री राजुचे मित्र विनोद भिल, भगवान भिल हे दोघेही त्याच्या घरी आले. तिघांनी यथेच्छ दारु ढोसल्यानंतर राजू भिल तर्रर्र झाल्यावर विनोद व भगावन यांनी ममताला ट्रिपलसीट दुचाकीवर घेवून गेले होते. रात्रभर पत्नी घरी आली नाही म्हणुन राजू सकाळीच तिचा शोध घेत असतांना एका महिलेचा मृतदेह जवळच नेव्हऱ्या नाल्या जवळ आढळून आला. पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी पोलिसांना घटना कळवल्यावर निरीक्षक सुनील कुराडे पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा केल्यावर मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

अनैतीक संबधातून खुनाचा अंदाज
ममता बारेला या तिस वर्षीय महिलेस भगावान व विनोद रात्री सोबत घेवून गेले होते. अनैतीक सबंधासाठी बळजबरी करुन तिला मारझोड झाल्याने त्यात तिचा मृत्यु झाल्याचा प्राथमीक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तिघे ताब्यात..
मयत ममता बारेलाचा पती राजु मानसींग बारेला, भगवान भिल, विनोद भिल या दोघांना निरीक्षक कुराडे यांनी ताब्यात घेत चौकशी सुरु केली असून, औद्योगीक वसाहत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
जियोची ‘धन धना धन’ ऑफर संपतेय; आता पुढे काय?​
500-1000 च्या जुन्या नोटा भरण्यासाठी पुन्हा संधी द्या : सर्वोच्च न्यायालय​
हिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर​
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news women murder in shirsoli