Adivasi Congress cell office bearers protesting in front of the Collector's office demanding an immediate stop to the felling of trees in the Hasdev forest in Chhattisgarh.
Adivasi Congress cell office bearers protesting in front of the Collector's office demanding an immediate stop to the felling of trees in the Hasdev forest in Chhattisgarh.esakal

Dhule News : हसदेव जंगलातील वृक्षतोड थांबवा; आदिवासी काँग्रेस सेल

छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगलात होणारी वृक्षतोड तत्काळ थांबवा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस सेलने केली.

Dhule News : छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगलात होणारी वृक्षतोड तत्काळ थांबवा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस सेलने केली. या वृक्षतोडीचा निषेधही केला. दरम्यान, वृक्षतोड न थांबल्यास राज्यभरात जनआंदोलन करू असा इशाराही देण्यात आला.

याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन दिले. (Maharashtra Pradesh Adivasi Congress Cell demanded immediate stop to felling of trees in Hasdev forest dhule news)

छत्तीसगड राज्यातील सरगुणा जिल्ह्यातील उदयपूर परिसरातील घाटबऱ्याच्या पेट्रोमार जंगल हे आदिवासींचे देवस्थान हसदेव जंगल परिसर आहे. भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसुचीमध्ये हे जंगल जैवविविधतेने नटलेले आहे.

या परिसरात कोळसा मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे जंगलातील ९२ हेक्टर क्षेत्रात उद्योजक गौतम अदानी यांना कोळसा उत्खननासाठी बेकायदेशीररीत्या परवानगी दिली आहे.

४५० पेक्षा जास्त जवान हसदेव जंगलात यंत्राद्वारे जंगलतोड करत आहेत.

Adivasi Congress cell office bearers protesting in front of the Collector's office demanding an immediate stop to the felling of trees in the Hasdev forest in Chhattisgarh.
Dhule News : पांझरा नदीपात्रात श्रीराम मंदिराची प्रतिकृती

त्याचा महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेस सेल तीव्र निषेध करत आहे.

दरम्यान, ही जंगलतोड त्वरित थांबवा अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आले. जंगलतोड न थांबल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन महाराष्ट्रभर उभे केले जाईल असा इशाराही निवेदनातून दिला.

आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे, भानुदास गांगुर्डे, विजय मोरे, बापू ठाकरे, एकनाथ ठाकरे आदींनी हे निवेदन दिले.

Adivasi Congress cell office bearers protesting in front of the Collector's office demanding an immediate stop to the felling of trees in the Hasdev forest in Chhattisgarh.
Dhule News : मराठा समाजबांधव पदयात्रा आज मुंबईकडे रवाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com