Collector Abhinav Goyal speaking in the meeting about Mahasanskrit Mahotsav
Collector Abhinav Goyal speaking in the meeting about Mahasanskrit Mahotsavesakal

Dhule News : महासंस्कृती महोत्सवात भरगच्च कार्यक्रम; 5 दिवसांचा महोत्सव

महासंस्कृती व महानाट्य महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

Dhule News : स्थानिक कलाकारांना व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला, संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने धुळे जिल्ह्यात पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव होणार आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले.

महासंस्कृती व महानाट्य महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. (Mahasanskruti Mahotsav 5 days program dhule news)

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव.

उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, हेमंत भदाणे, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका शिल्पा नाईक, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी मनीष पवार.

जिल्हा माहिती व सूचना विज्ञान अधिकारी महेश खडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागांतर्गत हा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केला जात आहे.

महोत्सवाच्या आयोजन व सुयोग्य नियोजनासाठी समन्वय व संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने कार्यक्रमस्थळाची जागा निश्चित करावी, आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील मान्यवरांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करावे, कार्यक्रमस्थळी वीज, पाणी व विविध परवानग्या उपलब्ध करून द्याव्यात, तसेच कार्यक्रमास जास्तीत जास्त प्रेक्षक कसे येतील याचे सूक्ष्म नियोजन करावे.

Collector Abhinav Goyal speaking in the meeting about Mahasanskrit Mahotsav
Dhule Water Shortage : जिल्ह्यात 302 गावांसह 39 वाड्यांना टंचाईची झळ!

पाच दिवस भरगच्च कार्यक्रम

विविध कलाप्रकार, कार्यक्रमांची निश्चिती करावी, कलाकार व कलाप्रकार यांच्या निवडीबाबत स्थानिक कलावंतांचा प्राधान्याने विचार करावा. कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करावी. महासंस्कृती महोत्सवात पुस्तक प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, बचतगट उत्पादन.

वस्त्रसंस्कृती दालन, शस्त्र प्रदर्शन, पर्यटन दालन, महाराष्ट्राचे संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेचे विविध प्रकार, स्थानिक दुर्मिळ व लुप्त होत असलेल्या लोककला व संस्कृती कार्यक्रम, खानदेशातील वहीगायन, कविता, देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम, मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला आदी भरगच्च कार्यक्रम या पाच दिवसांत आयोजित करण्यात येणार आहेत.

राज्याभिषेक वर्षानिमित्त

महानाट्य महोत्सव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनमानसांपर्यत पोचविण्यासाठी धुळे जिल्ह्यात महानाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत जाणता राजा संस्थेमार्फत जिल्ह्यात महानाट्याचे सलग तीन दिवस तीन प्रयोग होतील.

या कार्यक्रमासाठी जनसामान्यांना दळणवळणासाठी सोईच्या जागेची पाहणी करावी. आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्या, राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील मान्यवरांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करावे. कार्यक्रमास जास्तीत जास्त प्रेक्षक येतील यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Collector Abhinav Goyal speaking in the meeting about Mahasanskrit Mahotsav
Dhule Ajit Pawar News : ‘अक्कलपाडा’ धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com