Makar Sankrant News : आकाशात दिवसभर रंगले पतंगांचे शीतयुद्ध

Nandurbar: Women, young women and young children fly kites on the occasion of Kite festival
Nandurbar: Women, young women and young children fly kites on the occasion of Kite festivalesakal

नंदुरबार : दररोज मंदिरातील महाआरती... धार्मिक गीतांच्या आवाजाने गुंजणारी पहाट रविवारी (ता. १५) मात्र विविध प्रकारच्या हिंदी-मराठी, जुन्या-नव्या गीतांसह रिमिक्सच्या आवाजाने सुरू झाली.

त्यातच ढील दे दे रे भय्या... काटे काटे... येणाऱ्या आवाजाने हुडहुडी भरणाऱ्या थंडीत पतंग उडविणाऱ्या तरुणांच्या जल्लोषाने सकाळ गुंजली होती. त्याला निमित्त होते ते मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सवाचे. (Makar Sankranti Celebrate by full family in terrace by flying kite happily nandurbar news)

Nandurbar: Women, young women and young children fly kites on the occasion of Kite festival
Jalgaon News : जुना खेडी रोडवरील तीन घरांवर संक्रात

पतंगोत्सव म्हणजे नंदुरबारच्या तरुणाईसाठी आनंदपर्वणीच असते. वर्षातून येणारा या एकदिवसीय सणाची साऱ्यांनाच आतुरता लागलेली असते. डिसेंबर २०२२ संपला अन् नवीन वर्षाला सुरवात होताच साऱ्यांनाच मकरसंक्रांती म्हणजेच पतंगोत्सव येत असल्याची चाहूल लागली.

त्यामुळे पतंग व मांजा विक्रेत्यांनी तर १५ दिवसांपूर्वीच दुकाने थाटायला सुरवात केली होती. नूतन वर्षाच्या आगमनाबरोबरच शहरातील गल्लीबोळात पतंग व मांजा विक्रीलाही सुरवात झाली होती. त्यामुळे ज्या दिवसाची साऱ्यांनाच प्रतीक्षा होती. तो दिवस अखेर उजळला. या दिवसाचे पूर्वनियोजन शनिवारीच (ता. १४) केले होते.

घराच्या टेरेसवर स्पीकर, टेप, साउंड सिस्टिम, जुन्या-नव्या हिंदी-मराठी गाण्यांचे सेटिंग करून ठेवले. रिमिक्सचा झटका आणि तरुणाईला ठेका धरायला लावणारे गाणे सेट करून तरुणाई सज्ज झाली होती. डझनावारी पतंगांची गड्डी, मांजाच्या चकरीचा स्टॉक केला होता. आजचा दिवस म्हणजे केवळ टेरेसवरच घालवायचा या बेतानेच सारे सज्ज झाले होते.

Nandurbar: Women, young women and young children fly kites on the occasion of Kite festival
Nashik Crime News : ओझर येथील खून प्रकरण प्रेम संबंधातून झाल्याचे उघडकीस

दररोज शहरातील मंदिरांत वाजविले जाणारी भोंग्यावरील आरती, भक्तिगीतांच्या आवाजाने सुरेली सकाळ होत असते. रविवारी मात्र मंदिरातील गाणे, आरतीचा थांगपत्ताही लागला नाही. एवढ्या मोठ्या आवाजात पहाटे पाचपासूनच तरुणाईने टेरेसवरील साउंड सिस्टिम सुरू करून पतंग उडविण्यास सुरवात केली होती.

मंद हवा, थंडीचा गारठा आणि त्यात आकाशात झेप घेणारा पतंग, त्याचा पाठलाग करीत कापण्यासाठी प्रयत्न करणारे इतर तरुण... काट झाल्यावर काटे काटेच्या आवाजाने होणारा जल्लोष यामुळे वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासूनच आकाशात रंगीबेरंगी पतंगांचे शीतयुद्ध सुरू झाले होते.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Nandurbar: Women, young women and young children fly kites on the occasion of Kite festival
Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्याची नासाडी

या शीतयुद्धात काट होणारा पतंग पकडण्याचा आनंद लुटणारी छोटी छोटी बालके आपल्या वेगळ्याच दुनियेत पळत फिरत होती. अनेकांना पतंग उंच उंच उडविण्याचा आनंद होत होता. काहींना पतंग काट करण्यात मजा येत होती, तर काहींसाठी या दोन्हीपेक्षा पतंग लुटण्यासाठी व मांजा गोळा करण्यात आनंद वाटत होता.पतंग उडविण्यात मुलेच नव्हे तर मुली व महिलांनीही तेवढाच सहभाग घेत गाण्यांचा तालावर ठेका धरत पतंग उडविण्याचा आनंद लुटला. त्यात लहान बालकेही मागे राहिली नाहीत.

व्यापारी प्रतिष्ठाने बंद

आज दिवसभर पतंग व मांजा विक्रेत्याकडे गर्दी होती. त्यामुळे या दोन दिवसांत पतंग खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल झाली. व्यापारी-व्यावसायिकांनी रविवारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत पतंग उडविण्याचा आनंद लुटला. योगायोगाने रविवार, त्यात शाळा-महाविद्यालयांसह शासकीय-निमशासकीय कार्यालयांना असलेली सुटी व रविवारी शहरातील बंद असणारी प्रतिष्ठाने यामुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. सायंकाळी अंधार पडेपर्यंत पतंगांचे आकाशात शीतयुद्ध सुरूच होते.

Nandurbar: Women, young women and young children fly kites on the occasion of Kite festival
Nashik News : रामतीर्थावर 18व्या शतकातील शिलालेख; पुण्याचे विरगळ अभ्यासक अनिल दुधाणेंचे संशोधन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com