माणिकराव शिंदे यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी...कारण...  

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 3 January 2020

प्रदेश कार्यालयाकडे कात्रणे व इतर पुरावे प्राप्त झाली होती. याची शिस्तपालन समितीकडून सत्यता तपासणी केली गेली. त्यानंतर प्रदेश कार्यालयाकडे अहवाल पाठवून शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असे कळविले होते. तसेच खुलासा मागविला होता. मात्र, त्यांनी केलेला खुलासा सत्य परिस्थितीशी सुसंगत नसल्याने ही कारवाई करण्यात आली. 

नाशिक : प्रदेश चिटणीसपदावर असतानाही येथील ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात जाऊन शिवसेना उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळे पक्षाने शिंदे यांच्यावर उशिराने कारवाईचा बडगा उचलला असून, त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी गुरुवारी (ता. 2) पत्राद्वारे जाहीर केला. 

भुजबळांना विरोध अन्‌ शिवसेनाप्रेम भोवले 

2004 मध्ये भुजबळांना येवल्यातून उमेदवारीसाठी आग्रह करून मी त्यांचा प्रचारक झालो होतो. त्यावेळी मला दिलेला विधान परिषदेचा शब्द अद्यापही पाळला गेला नसल्याचा आरोप करून, भुजबळांना मी आणले आता मीच घालवणार, अशी शिंदे यांनी उघड भूमिका घेतली होती. त्यामुळे ही कारवाई झाली आहे. गर्जे यांनी याबाबत शिंदे व जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांच्याकडे पत्र दिले आहे. मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते भुजबळ यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली असताना शिंदे पक्षविरोधी भूमिका घेत विरोधी पक्षाचे संभाजी पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते. भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्यावर खोटे-नाटे आरोप केले. याबाबत पक्षाच्या शिस्तपालन समितीने दखल घेऊन पक्षाकडे अहवाल सादर केल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्रात म्हटले आहे. प्रदेश कार्यालयाकडे कात्रणे व इतर पुरावे प्राप्त झाली होती. याची शिस्तपालन समितीकडून सत्यता तपासणी केली गेली. त्यानंतर प्रदेश कार्यालयाकडे अहवाल पाठवून शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असे कळविले होते. तसेच खुलासा मागविला होता. मात्र, त्यांनी केलेला खुलासा सत्य परिस्थितीशी सुसंगत नसल्याने ही कारवाई करण्यात आली. 

हेही वाचा > राष्ट्रवादी काँग्रेस एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकला - छगन भुजबळ

शिंदेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर येथे एका कार्यक्रमात बोलताना, मी राष्ट्रवादीतच असून अजितदादांचा समर्थक असल्याचे शिंदे म्हणाले होते. खरेतर पवार कुटुंबीय अन्‌ शिंदे यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळे पक्षातून हकालपट्टीच्या निर्णयानंतर आता शिंदे इतर पक्षात जातात की शांत राहून यापुढे काय भूमिका घेतात, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 
हेही वाचा > रात्रीचा 'तिचा' प्रवास...उद्यानात दारूच्या पार्ट्या रंगताना 'ते' तिला बघतात..अन् मग...

हेही वाचा > संशयिताला पकडताना झाली झटापट...त्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचेच मात्र..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manikrao Shinde Dismissed from NCP Political Nashik Marathi News