सावधान, सायबर गुन्ह्यात होताय वाढ..काय घ्‍यावी काळजी

सावधान, सायबर गुन्ह्यात होताय वाढ..काय घ्‍यावी काळजी
cyber crime
cyber crimecyber crime

नंदुरबार : कमी वेळेत जास्त पैसा या आमिषापोटी बरेच लोक सायबर (Cyber crime) जगतात बळी पडत आहेत. कोणाला २५ लाखांची लॉटरी लागली म्हणून एसएमएस किंवा इमेल, व्हॉटसअॅप मॅसेज (Social media whatsapp) पाठवून (लॉटरी फ्रॉड) तर कोणी कमी किमतीत वस्तू मिळत आहे (ओएलएक्स फ्रॉड) असे आमिष दाखवून फसवले जात आहे. लोक संशयिताने दिलेल्या बँक खात्यावर पैसे भरून फसतात, अशा सायबर गुन्ह्यापासून नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पोलिस विभागाच्या सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे. (cyber-crime-increase-police-take- care-massage-people)

सध्या आता सायबर क्राईम आरोपींनी नवनवीन प्रकारे गुन्हा करण्याची पद्धत सुरू केली आहे. ती म्हणजे ऑनलाइन सेक्सटॉर्शन (ऑनलाइन लैंगिक छळवणूक) म्हणजे सुरुवातीला एखाद्या मुलीच्या किंवा स्त्रीच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे. त्यानंतर ती समोरच्या अॅक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यासोबत त्या मुलीने, स्त्रीने फेसबुक मॅसेजरवर चॅट करणे व त्या मुलाचा किंवा माणसाचा व्हॉटसअॅप नंबर घेणे. मग त्या व्हॉटसअॅप नंबरवर त्या मुलीने उत्तेजित करणारी चॅटींग करणे. चॅटींग करता करता सर्व भान विसरून ती जसे सांगते तसे करण्यास भाग पाडतात. तो पर्यंत ती हे सर्व स्क्रीन रेकॉर्ड करून घेते आणि मग इथून ब्लॅक मेलींग चालू होते. नंतर तो व्हिडिओ संबंधितांना पाठविला जातो व पैशांची मागणी केली जाते. नाहीतर हा व्हिडिओ मित्रांना, नातेवाइकांना पाठवून तुमची बदनामी करू. अशा धमक्या दिल्या जातात. त्यामुळे असे काही घडू नये, म्हणून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिस निरीक्षक अर्जुन पटले यांनी केले आहे.

cyber crime
दरेगाव शिवारात आढळला धुळ्यातील तरुणाचा मृतदेह

ही घ्या काळजी..

- फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये.

- घटना घडलीच तर घाबरून न जाता जवळच्या पोलिस स्टेशन किंवा सायबर सेलला जाऊन किंवा www.cybercrime.gov.in यावर ऑनलाइन तक्रार करावी.

- अनोळखी/अज्ञात, मोबाईल क्रमांकावरून आलेले कॉल, मॅसेंजेस, लिंक, अॅप्स ओपन करू नयेत व इतरांना देखील याबाबत जागरूक करावे व दक्ष राहावे.

- लॉटरीचे मॅसेज आल्यानंतर लगेच डिलीट करणे, मॅसेज मध्ये आलेली कोणतीही लिंक उघडू नये.

- आपली बॅंकेबाबतची, वैयक्तिक खाजगी माहिती देऊ नये. ओटीपी शेअर करू नये.

- तसेच ओएलएक्‍स वरून वस्तू खरेदी करताना वस्तू समक्ष पाहिल्याशिवाय पैशांचा व्यवहार करू नये.

- बँकेतून/फोनपे कस्टमर केअर अधिकारी बोलत असल्याचे सांगून लोकांना फोन करतात आणि आपली केवायसी अपडेट करावयाची आहे म्हणून आपली बँकेची गोपनीय माहिती विचारून आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम आपल्याला बोलण्यात गुंतवून ऑनलाइन इतर दुसऱ्या खात्यात वळती करतात. त्यामुळे अशा फसव्या लोकांपासून सावध राहावे .

- स्वत: आपण बँकेत जाऊन खात्री करावी. कोणतीही बँक आपल्याला मोबाईल फोनवरून माहिती विचारत नाही त्यामुळे अशा गोष्टींपासून दक्ष राहावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com