तरीही सोनगीरला सहा दिवसाआड पाणी

तरीही सोनगीरला सहा दिवसाआड पाणी
Water crisis
Water crisisWater crisis

सोनगीर (धुळे) : पुरेसे पाणी असतांना वीजेचा लपंडाव, इलेक्ट्रीक मोटार नादुरुस्त, जामफळ प्रकल्पाचे खोदकामात सोनगीरला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या जलवाहिनींची तोडफोड आदींमुळे ग्रामस्थांना सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. जामफळ धरणातील फोडलेली जलवाहिनी पुन्हा जोडून देण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली होती. मात्र जामफळ प्रकल्पाचे ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केल्याने सहा दिवसाआड पाणी (Water crisis) मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर नवीन पाणी पुरवठा योजना सुरू होणे गरजेचे असून जामफळ प्रकल्पाच्या (Jamfal project) ठेकेदाराने अथवा प्रशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे. (songir village six day water supply jamfal project)

Water crisis
राज्याची सीमाबंदी तरीही परराज्यातून अनधिकृत बियाणांचा पुरवठा

सोनगीरला पाणी पुरवठेचा मुख्य स्त्रोत जामफळ धरणावरून आहे. मात्र जामफळ प्रकल्पाचे विस्तारीकरण सुरू असून खोदकामात जलवाहिनींसह चार सिंचन विहीरी, विद्युत उपकरणाचे मोठे नुकसान झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. केवळ एका विहिरीवरून पाणी मिळत असल्याने गावातील पाणी पुरवठा सहा दिवसाआड होते. जामफळची जलवाहिनी दुरुस्तीसह नुकसान भरपाई मिळावी अशा मागणीचे निवेदन सरपंच रुखमाबाई ठाकरे, उपसरपंच प्रतिनिधी धाकूशेठ बडगुजर, ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांनी यापूर्वीच दिला आहे.

एकाच विहिरीतून पाणी

सोनगीरच्या २५ ते ३० हजार लोकवस्तीला पाणीपुरवठ्यासाठी जामफळ धरण परिसरात चार विहीरी खोदल्या आहेत. त्यापैकी तीन विहीर बुडीत क्षेत्रात गेल्या असून सध्या एकाच विहीरीतून गावाला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ही विहीर व जलवाहिनी काढून टाकल्यास सोनगीरला अभूतपूर्व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास अजून तीन वर्षे लागतील. तोपर्यंत गावाला पाणीपुरवठा कसा करणार? एखादी नवीन पाणीपुरवठा योजना होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीची व सध्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरी व जलवाहिनी कायम ठेवावी. प्रकल्पामुळे ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये. तसेच पुढे जामफळ धरणामधून फिल्टर प्लान्टसह नवीन योजना करून मिळावी अशी मागणी आहे.

Water crisis
सिंचन विहिरींची परस्पर मंजुरी भोवली; बीडीओंचा पदभार काढला

जलवाहिनी दुरूस्‍तीकडे दुर्लक्ष

प्रकल्पाचे ठेकेदाराने जलवाहिनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी लवकरच तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल अशी चिन्हे आहेत. सध्या तलावाजवळील दोन कुपनलिका व सोमेश्वर मंदिराजवळ एक, पीर स्थानक रस्तालगतची एक कुपनलिका, धरणातील एक विहीर येथून पाणी पुरवठा होतो. पाणी पुरेसे आहे पण मागे वादळामुळे दोन दिवस वीजपुरवठेत व्यत्यय आला. सध्या एका कूपनलिकेचा पंप नादुरुस्त आहे. लवकरच पंप दुरूस्त झाल्यास पाणीपुरवठा पाच दिवसात होईल असे सांगण्यात आले.

तलावात विहीर खोदणार

जामफळ प्रकल्पाचे कामात जलवाहिनी दुरुस्ती करूनही फारसा उपयोग नाही. विहीरींचे अस्तित्वही फार काळ टिकणार नाही. त्यामुळे ठेकेदाराने शासनातर्फे नुकसान भरपाई मिळवून द्यावी. भरपाई मिळाल्यास येथील तलावालगत विहीर खोदून पाणीटंचाई दूर केली जाईल असे ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com