जलयुक्त शिवारच्या कामांचा बोजवारा; लाखोंचा निधी पाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalyukt shivar

जलयुक्त शिवारच्या कामांचा बोजवारा; लाखोंचा निधी पाण्यात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वडाळी (नंदुरबार) : शेतकऱ्यांच्या शेतीला व विहिरींना, कूपनलिकेला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, संकटात असणारा शेतकरी समाधानी व्हावा, यादृष्टीने जलयुक्त शिवार योजना महत्त्वाची असून, त्यासाठी शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च करूनही या योजनेचा शेतकऱ्यांना काडीमात्रचाही लाभ झाला नसल्याचे चित्र वडाळी परिसरात आहे. (nandurbar jalyukt shivar working fraud fund loss)

हेही वाचा: लुटेरी दुल्‍हन..विवाह करून पंधराच दिवस नांदायची

राज्य सरकार, विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना महत्त्वाची ठरली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूदही राज्य शासनाने केली. परंतु कामे निकृष्ट केल्यामुळे गेल्या वर्षी पहिल्या पावसातच बंधाऱ्यांना गळती लागली होती. तर काही ठिकाणी बंधारेच पावसात वाहून गेले. यामुळे शासनाचा कोट्यवधीचा निधी वाया जाऊन एक थेंबही पाणी साचले नाही. शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला.

हेही वाचा: 21 वं शतक अन् 21 वा दिवस; वाचा आजचा दिवस कसा आहे प्रत्येकासाठी खास..

बांधकाम साहित्य निकृष्ट

शहादा तालुक्यात ठिकठिकाणी बांधलेल्या बंधाऱ्यांना वर्षभरात गळती लागणे किंवा तुटून पडण्यासारखे प्रकार झाले आहेत. हा सगळा प्रकार मातीमिश्रित वाळू, निकृष्ट खडी आदी साहित्याच्या वापरामुळे झाला आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह ठेकेदारही कमी खर्चात बांधकाम कसे होईल, याचाच विचार करतात. त्यात कामाच्या दर्जाचा विचार कधीच होत नाही. त्यामुळे पहिल्या पावसातच बंधारे वाहून गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.

पुढारीच झाले ठेकेदार

राजकीय पुढारीच या कामांची ठेकेदारी सांभाळत असल्याने तसेच ठेकेदारांवर या भागातील राजकीय पुढाऱ्यांचे आशीर्वाद असल्याने सहसा त्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. शहादा तालुक्यात राजकीय वरदहस्त असल्याने तसेच जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे, लघुसिंचन विभागामार्फत वडाळीसह कोंढावळ, खापरखेडा, बामखेडा त.त., कहाटूळ, कळंबू, जयनगर, धांद्रे, लोंढरे आदी भागांत जबाबदार अधिकारी फिरकत नसल्यामुळे जलयुक्त शिवारातील बंधाऱ्यात पाणी किती मुरले हेच कोणाला कळेना, असे चित्र आहे.

हेही वाचा: जिल्‍हाधिकारींची उन्‍हात चार किमी पायपीट; रोहयो कामांची पाहणी

गुणवत्ता तपासण्याची गरज

शहादा तालुक्यातील बहुतेक ठिकाणी खोलीकरणाचे, जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू असून, अधिकारी प्रत्यक्ष भेट देत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शंका-कुशंकांना खतपाणी मिळत आहे. काम देताना संबंधित ठेकेदारांची गुणवत्ता तपासली जात नसल्यामुळे असे प्रकार समोर येत आहेत. मात्र या निकृष्ट कामामुळे शेतकरीराजाची पिळवणूक होत आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी वडाळीसह परिसरातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बंधारे बांधले होते. त्याचे काम निकृष्ट झाले असून, बंधाऱ्याचे एकाच वर्षात एकचे दोन झाले. यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीलाही संबंधित ठेकेदार व अधिकारी जबाबदार आहेत. या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी. तसेच दोषी अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करावी.

- चंद्रकांत निकम, शेतकरी, वडाळी (ता. शहादा)

loading image
go to top