गोरगरीबांसाठी शिक्षकांनी उभारला "सानेगुरुजी अन्नदान स्वेच्छानिधी" 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 एप्रिल 2020

लॉकडाऊनच्या नियमांचे पालन व स्वत:ची काळजी घेऊन प्रत्यक्ष भेट होऊ शकत नसल्यामुळे व्हॉटस्अॅप ग्रुपच्‍या माध्यमातून संपर्क करुन ऑनलाईनचा पर्याय स्विकारत शिक्षक दात्यांनी आपली रक्कम जमा केली.

अमळनेरः तालुक्यातील उपक्रमशील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या 'सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच' या व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून ६७ शिक्षकांनी एकत्रितपणे ४४ हजार १०० रुपयांचा "सानेगुरुजी अन्नदान स्वेच्छानिधी" उभारला आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात शहरातील मोल मजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्यासाठी अन्नदान निधीमुळे सामाजिक दायित्व पूर्ण केले आहे. 

क्‍लिक कराःआदेशाला हरताळ... कापूस खरेदी बंदच! 
 

हजारो लोकांना अन्नदानासाठी सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच समूहाने पुढाकार घेऊन प्रशासनाचे आदेश तथा लॉकडाऊनच्या नियमांचे पालन व स्वत:ची काळजी घेऊन प्रत्यक्ष भेट होऊ शकत नसल्यामुळे व्हॉटस्अॅप ग्रुपच्‍या माध्यमातून संपर्क करुन ऑनलाईनचा पर्याय स्विकारत शिक्षक दात्यांनी आपली रक्कम जमा केली. सदर जमा निधी सुपूर्द करण्यासाठी अमळनेर शहरातील हातावर पोट असलेल्या गोरगरीबांच्या जेवणाची पालकत्व म्हणून जबाबदारी स्विकारून १८ ते २० ठिकाणी सुरु असलेल्या अन्नछत्रासाठी एकत्रित स्वयंपाक तयार करणाऱ्या श्रीमती भानुबेन शहा गोशाळा, (पळासदडे रोड) तर्फे अन्नदान सुरू आहे.

येथील सेंट्रल किचन सेंटरवर गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांचे प्रमुख उपस्थितीत सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंचचे सदस्य एस. डी. देशमुख, मंगला पाटील, छाया सोनवणे, विद्यादेवी कदम, वाल्मिक पाटील, रामकृष्ण बाविस्कर, डी. ए. धनगर, दत्तात्रय सोनवणे, उमेश काटे, शरद पाटील, संजय पाटील, रणजित शिंदे, योगराज पाटील, अशोक इसे, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. दिवसेंदिवस अन्नदानासाठी शहराच्या विविध भागांतील गरजू कुटुंबातील लोकांची संख्या वाढतच चालली आहे, अशा वेळी शहरातील दाते गोशाळेतर्फे सुरू असलेल्या या अन्नक्षेत्र समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होऊन योगदान देत असल्याने या संकटकाळी गोरगरिबांच्या जेवणाची सोय होत आहे. विविध क्षेत्रातील दात्यांनी असेच पुढाकार घेऊन अन्नदानासाठी सहकार्य करत राहावे, असे गोशाळेतर्फे चेतन शाह, राजू शेठ, प्रा. अशोक पवार, महेंद्र पाटील, संदीप घोरपडे, डी. ए. धनगर, रणजित शिंदे यांनी सांगितले आहे. 

नक्की वाचा :  विद्यार्थी रमले "डिजिटल' विश्‍वात..."लॉकडाउन' काळातील वेळेचा सदुपयोग

अन्नदान स्वेच्छानिधी देणारे शिक्षक 
अशोक इसे, छाया इसे, चंद्रकांत देसले, आर. डी. महाजन, दत्तात्रय सोनवणे, डी. ए. धनगर, विलास पाटील, राजेंद्र पाटील, सुरेखा बोरसे, चंद्रकांत पाटील, जयश्री पवार, प्रवीण पाटील, रामकृष्ण बाविस्कर, प्रतिभा बाविस्कर, गौरव बाविस्कर, भूषण महाले, बी. एस. पाटील, मंगला पाटील, रोहित पाटील, भैय्यासाहेब साळुंके, वसंत पाटील, दिलीप सोनवणे, ज्ञानेश्वर मोरे, विलास पाटील, प्रेमराज पवार, एस. डी. देशमुख, अरुण मोरे, जगदीश पाटील, दिनेश मोरे, प्रदीप चव्हाण, संजय पाटील, प्रकाश पाटील, कुणाल पवार, वनिता शिसोदे, सुमित शिसोदे, अशोक पाटील, हरेश्वर सैंदाणे, श्री स्वामी समर्थ, योगराज पाटील, संगिता शिंदे, शशिकांत आढावे, दीपक पाटील, राजेंद्र सोनवणे, रामेश्वर भदाणे, वाल्मिक मराठे, रेखा पाटील, भगवान पाटील, वंदना पाटील, गोपाल हडपे, दीपक भामरे, जे. एस. पाटील, रणजित शिंदे, गणेश बोढरे, महेश बोरसे, रत्नाकर पाटील, छगन पाटील, निरंजन पेंढारे, ललितकुमार पाटील, विजय पाटील, छाया सोनवणे, अश्विन पाटील, मनिषा पाटील, विद्यादेवी कदम, हेमकांत लोहार, शरद पाटील, विशाल देशमुख, उमेश काटे आदींचा समावेश आहे. 

आर्वजून पहा : जळगाव जिल्ह्यात आणखी एक "कोरोना'बाधित; "त्या' मृताचा अहवाल..
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Amalner Teachers set up "Saneguruji Annadan Swechchanidhi" for the poor