रेल्वे कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका. कारखाने बंद ठेवण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

कंटेनमेंट झोनमधील कर्मचाऱ्यांना देखील एमओएच मध्ये काम करावे लागत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भुसावळ  : जळगाव जिल्हा रेड झोनमध्ये असून, भुसावळातही दररोज नवनविन भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. अशा परिस्थितीत रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रतिबंधित भागातून ये-जा करावी लागते. शिवाय काम करताना प्रतिबंधात्मक सामग्रीसह सोशल डिस्टन्सिगचा अभाव जाणवत आहे. ही बाब धोकादायक असून, रेल्वे कारखाना बंद करण्याची मागणी रेल कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.

क्‍लिक कराः Video : भुसावळला कोरोनामुक्त रुग्णांचे फुले उधळून स्वागत; दोन डॉक्टरही...
 

रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. शहरात रेल्वेच्या पीओएच, एमओएच, ट्रॅकमॅन-इंजीनियरिंग, डीसीओएस, डीआरएम कार्यालय व इतर ठिकाणी ड्यूटी सुरु आहे. रेल्वेचे विविध कार्यालय हे प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळच आहेत. तरी सुद्धा पीओएच कारखाना सुरू करण्यात येत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रतिबंधित क्षेत्रातून ये-जा करावी लागणार आहे. ही बाब धोकादायक असून, रेल्वे कारखाना बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी मंडल अध्यक्ष ललितकुमार मुथा, मंडल कार्याध्यक्ष प्रितम टाक, मंडल उपाध्यक्ष अरविंद थोरात उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडलला आश्वासन दिले. 

आर्वजून पहा : Video : पालकमंत्र्यांनी "डीन', "सी.एस.' यांना दिल्या समझोत्याच्या सूचना 

प्रतिबंधात्मक सामग्रीचा अभाव
रेल्वे दवाखान्यास कोविड रुग्णालय म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मात्र याठिकाणी असलेल्या कमतरता दूर करण्यासाठी दवाखान्यात भेट द्यावी, तसेच रेल्वे कामगारांना कोरोना प्रतिबंधक वैद्यकीय सामग्री पुरेश्‍या प्रमाणात मिळत नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. कंटेनमेंट झोनमधील कर्मचाऱ्यांना देखील एमओएच मध्ये काम करावे लागत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे बोर्डाच्यां आदेशाचे पालन करत, बाकीचे दुय्यम दर्जाचे रेल्वेचे कार्य बंदची मागणी केली आहे.

नक्की वाचा :  "आयएमए'चे 250 डॉक्‍टर "कोरोना'त सेवा देणार : अध्यक्ष डॉ.दीपक पाटील 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal train workars infection Risk stop Factory Demand