कोरोना : धुळ्याचा बहुतांश भाग "सील'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

शहराचा 60-70 टक्के भाग आत्तापर्यंत सील झाला आहे. या क्षेत्रात महापालिकेतर्फे सॅनिटायझेशन, कुटुंब सर्वेक्षण, संपर्कातील रुग्णांचा शोध आदी विविध उपाययोजना सुरु आहेत.  

धुळे : शहरात गेल्या तीन दिवसात नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आल्याने महापालिका आयुक्तांनी ते-ते भाग कंटनेमेंट झोन घोषित केले. त्यामुळे शहरात आत्तापर्यंत आठ कंटेनमेंट झोन झाले आहेत. त्यामुळे शहराचा 60-70 टक्के भाग आत्तापर्यंत सील झाला आहे. या क्षेत्रात महापालिकेतर्फे सॅनिटायझेशन, कुटुंब सर्वेक्षण, संपर्कातील रुग्णांचा शोध आदी विविध उपाययोजना सुरु आहेत.  

हेपण वाचा - मेलो तरी तुम्हाला त्रास देणार नाही; तुम्ही फक्त आम्हाला सोडा साहेब...!

30 एप्रिलला शहरातील वडजाई रोड परिसरातील फिरदोस नगर तसेच गरीब नवाज नगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आले. त्यामुळे महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी हे भाग कंटेनमेंट झोन घोषित केले आहेत. दरम्यान, काल शहरातील गल्ली क्रमांक-6 मधील एक रुग्ण कोरोनाबिधित आढळला. संबंधित रुग्ण सध्या नाशिक येथे उपचार घेत आहे. शहरातील गल्ली क्रमांक-6 हा भाग यापूर्वीच कंटेनमेंट झोनमध्ये आहे.

क्‍लिक करा - Video घंटागाडीत चक्क माती, खडी भरली

नव्याने प्रतिबंधित क्षेत्र असे
फिरदोस नगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आल्याने महापालिकेने हा भाग कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. मच्छीबाजार पोलिस चौकी, वडजाईरोड क्रॉसिंगपासुन नटराज थिएटरपर्यंत, नटराज थिएटरजवळून वाखारकर नगरकडे जाणाऱ्या रस्त्याकडे नाला क्रॉसिंगपर्यंत, नाला क्रासिंगने वाखारकर नगर रस्त्याने दक्षिणेकडे अरिहंत मंगल कार्यालयापर्यंत, तेथुन पुढे दक्षिणेकडे पिठाच्या गिरणीपर्यंत, तेथुन पश्‍चिमेकडे डीपी रस्त्याने कत्तलखान्यापर्यंत वडजाई रोड क्रॉसिंग तेथुन वडजाई रस्त्याने उत्तरेकडे गफुर नगर क्रॉसिंगपर्यंत, तेथन पश्‍चिमेकडे टीपी रस्त्याने रातराणी हॉटेलपर्यंत, तेथुन उत्तरेकडे जुन्या वडजाई रस्त्याने वडजाईरोड क्रॉसिंग मच्छीबाजार चौकीपर्यंत. या कंटेनमें झोनच्या चतुःसिमेच्या परिघापासुन 500 मीटर क्षेत्र बफर झोन घोषित करण्यात आले आहे.

गरीब नवाज भागाचाही समावेश
गरीब नवाज नगरमध्ये रुग्ण आढळल्याने रातराणी चौकातुन जुना वडजाई रस्त्याने दक्षिणेकडे शंभर फुटी रस्ता क्रॉसिंगपर्यंत, तेथुन पुढे पश्‍चिमेकडे शंभर फुटी रस्त्याने वडजाईरोड व शंभर फुटी रस्ता क्रॉसिंगपर्यंत, तेथुन उत्तरेकडे वडजाई रस्त्याने गफुर नगर चौकापर्यंत, तेथुन पुढे पश्‍चिमेकडे टीपी स्कीम रस्त्याने (आझाद नगर रस्त्याने) हॉटेल रातराणी चौकापर्यंत. कंटेनमेंट क्षेत्र तर या क्षेत्राच्या चतुःसिमेच्या परिघापासुन 500 मीटरचे क्षेत्र बफर झोन म्हणुन घोषित करण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news coronavirus dhule city aria sill and no entry