अबब...! 27 ग्रॅमच्या पुलाने चक्क पेलले तब्बल 38 किलोचे वजन 

अबब...! 27 ग्रॅमच्या पुलाने चक्क पेलले तब्बल 38 किलोचे वजन 

निजामपूर-जैताणे(धुळे) :विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी अमेरिकास्थित भारतीय अभियंता डॉ.संजय मेहता यांच्या प्रेरणेने येथील आदर्श विद्या मंदिराच्या नववीतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 26.69ग्रॅम वजनाच्या लाकडी पुलाने तब्बल 37.580किलोग्रॅम वजन पेलल्याने सर्वच अचंबित झाले आहेत. 5सेंटीमीटर रुंदी, 5सेंटीमीटर उंची असलेला व 45सेंटीमीटर लांबीचा हा पूल 'बालसा'नामक अमेरिकन लाकडापासून तयार करण्यात आला असून त्यात अमेरिकन ग्लुस्टिकचाही वापर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कच्ची साधनसामग्री अमेरिकेहून उपलब्ध करून देण्यात आली. 

मूळ मुंबईचे परंतु हल्ली अमेरिकास्थित अभियंता तथा सामाजिक कार्यकर्ते संजय मेहता यांनी औदार्य दाखवत विद्यार्थी विकासासाठी शाळेला धनादेशाद्वारे 21हजाराची देणगी देत दातृत्वाचा परिचय दिला. संस्थाध्यक्ष दशरथ जाधव यांनी संस्थेच्या वतीने हा 21हजाराचा धनादेश स्वीकारला.श्री.मेहता यांची सनदी लेखापाल पत्नी नयना मेहता,अमेरिकेत अकरावीत शिकणारा त्यांचा मुलगा जलज मेहता यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते त्रिलोक मेहता, राजेंद्र शहा, कमलेश शहा आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा धनादेश प्रदान करण्यात आला. 

यावेळी संस्थाध्यक्ष दशरथ जाधव,महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड.शरदचंद्र शहा, शालेय समितीचे अध्यक्ष अजितचंद्र शहा, संस्थेचे खजिनदार दत्तात्रय वाणी, सचिव नितीन शहा, संचालक बारीक पगारे, राजेंद्र वाणी, राजेंद्र येवले, राघो पगारे, प्राचार्य राजेंद्र चौधरी, उपमुख्याध्यापक जयंत भामरे, पर्यवेक्षक सुरेश माळी, प्रवीण शहा, रामचंद्र सोंजे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.संजय मेहता, नयना मेहता, जलज मेहता, त्रिलोक मेहता आदींच्या हस्ते पुलाचे उपकरण सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 

प्रत्येकी सहा विद्यार्थ्यांचे चार गट करण्यात आले. त्यात डॉ.सत्येंद्रनाथ बोस गटप्रमुख तेजस महाले, डॉ.सी.व्ही.रामन गटप्रमुख रोहित जगताप, श्रीनिवास रामानुजन गटप्रमुख लीना गवळे, डॉ.एपीजे.अब्दुल कलाम गटप्रमुख आदिती सोनवणे यांचे एकूण चार गट सहभागी झाले. त्यापैकी डॉ.सत्येंद्रनाथ बोस गटाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यात तेजस सुभाष महाले, प्रतीक जितेंद्र शिंपी, दिगंबर सुनील मोरे, गौरव कैलास खैरनार, रोहित गुलाब पवार, दुर्गेश भाऊराव शेवाळे आदी नववीच्या सहा विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला. तांत्रिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक बळवंत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी विकासमंच अंतर्गत ऍड.शहा, डॉ.मेहता व कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षक जितेंद्र चिंचोले यांनी परिचय करून दिला. देविदास पाडवी यांनी सूत्रसंचालन केले.तर वैभव येवले यांनी आभार मानले
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com