‘एमपीएससी‘ परीक्षा पुढे ढकलल्याने अभाविप, परीक्षार्थींचे धुळ्यात आंदोलन 

‘एमपीएससी‘ परीक्षा पुढे ढकलल्याने अभाविप, परीक्षार्थींचे धुळ्यात आंदोलन 

धुळे ः महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ची परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्याने संतप्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह परीक्षार्थी विद्यार्थी आज (ता.१२) येथे रस्त्यावर उतरले. ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौकात रास्तारोको आंदोलन सुरू केले. पोलिसांना घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांची समजूत काढावी लागली. या रास्तारोकोमुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. 

आवश्य वाचा- धानोरा जि. प. शाळेतील शिक्षक कोरोना बाधित


राज्य शासनाने यापूर्वीही एमपीएससीची परीक्षा चारवेळा पुढे ढकलली होती. दरम्यान, आता वेळापत्रकानुसार १४ मार्चला परीक्षा होणार होती मात्र कोरोना संसर्गाचे कारण पुढे करून राज्य शासनाने पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलली. एकीकडे शाळा-महाविद्यालये सुरू आहेत. इतरही परीक्षा घेतल्या जात आहे. मग एमपीएससी परीक्षाच का घेतल्या जात नाहीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. स्पर्धा परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींचा सामना करून ते शहरांमध्ये येऊन अभ्यास करतात. त्यात अनेक विद्यार्थी शासनाने ठरवून दिलेल्या वयोमर्यादेत बसणार नाहीत. परिणामी ते या परीक्षांपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शासनाने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेऊन ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. या मागणीसाठी परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह एमपीएससी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी येथील सावरकर पुतळा चौकात रास्तारोको आंदोलन सुरू केले. 

एसपींनी काढली समजूत 
विद्यार्थ्यांच्या रास्तारोको आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर देवपूर पोलिस ठाण्याचे एपीआय उमेश बोरसे व पथक तेथे दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या आंदोलनादरम्यानच पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित तेथून जात होते. त्यामुळे त्यांनी वाहन थांबवून आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. एमपीएससी परीक्षेबाबत शासन योग्य निर्णय घेईल. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. तुम्ही अशाप्रकारे कायदा हातात घेऊ नका. सनदशीर मार्गाने आंदोलन करावे असे विद्यार्थ्यांना समजावले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. विद्यार्थी परिषदेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भावेश भदाणे, निलेश गिळे, शहर संघटनमंत्री आदिती कुलकर्णी, वैष्णवी मराठे, चंद्रवर्धन देवरे, आदिनाथ कोठावदे, दीपक जैन, अविनाश आखाडे आदींसह कार्यकर्ते इतर विद्यार्थ्यांचा आंदोलनात सहभाग होता. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com