esakal | धुळे जिल्ह्यात तीन नवे कोरोना पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

आजचे तीनही पॉझिटिव्ह रुग्ण धुळे शहरातील आहेत. त्यात मोहाडीलगत 44 वर्षीय महिला, मच्छीबाजार परिसरातील 35 वर्षीय महिला व आझादनगर हद्दीतील तरूणाचा समावेश आहे.

धुळे जिल्ह्यात तीन नवे कोरोना पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोना व्हायरसचा खानदेशात प्रभाव वाढत आहे. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रूग्णांच्या संख्येत रोज वाढत असून, खानदेशातील तीनही जिल्हे आता रेडझोनमध्ये गेले आहेत. धुळे जिल्ह्यात तीन नवे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे धुळ्यातील एकूण रूग्णांची संख्या ही 24 वर पोहचली आहे. 

नक्‍की पहा- जळगावचा रेड झोनमध्ये एन्ट्री; चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे दाखल आणखी तीन रुग्णांच्या स्वॅबचे नमुने कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह आले आहेत. तर अन्य 15 रुग्णांच्या कोरोना विषाणूच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूंच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 झाली आहे. आजचे तीनही पॉझिटिव्ह रुग्ण धुळे शहरातील आहेत. त्यात मोहाडीलगत 44 वर्षीय महिला, मच्छीबाजार परिसरातील 35 वर्षीय महिला व आझादनगर हद्दीतील तरूणाचा समावेश आहे. पॉझिटीव्ह आढळून आलेले बाधित क्षेत्र प्रशासनातर्फे सील केले जात आहेत 

बाधित रूग्ण संख्या 
धुळे शहर 17 
साक्री शहर 4 
शिरपूर तालुका 2 
शिंदखेडा तालुका 1 

धुळे शहरातील 3, तर साक्रीतील एकाचा मृत्यू 

loading image